अखिल भारतीय काँग्रेसच्या प्रवक्त्यांमध्ये रविवारी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी फेरबदल केले असून चार नवे प्रवक्ते दाखल झाले आहेत. खासदार राज बब्बर, माजी केंद्रीय मंत्री शकील अहमद, भक्तचरण दास आणि मीम अफझल अशा नव्या प्रवक्त्यांची नियुक्ती गांधी यांनी केली आहे.
काँग्रेसच्या प्रवक्त्यांमध्ये आता या चौघांसह पी. सी. चाको, रेणुका चौधरी, मोहन प्रकाश, संदीप दीक्षित यांचाही समावेश आहे. विद्यमान प्रवक्त्यांमधून रशीद अल्वी यांना वगळण्यात आले आहे.