दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या वस्तू व सेवाकर (जीएसटी) विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसने ठेवलेल्या अटी सरकारने आज फेटाळून लावल्या. काँग्रेसची ही ‘पश्चातबुद्धी’ असून, त्यांनी स्वत:च मांडलेल्या विधेयकात हा भाग नव्हता, अशी टीका अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली.
कुठल्याही बाबतीत, विशेषत: केंद्र व राज्य सरकारांतील आर्थिक नात्यांचा संबंध असलेल्या मुद्दय़ाबाबत अशारीतीने पूर्वअटी घालणे हा कुठल्याही पक्षाकरिता विवेकी राजकारणाचा भाग असू शकत नाही, असे मत जेटली यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
वस्तू व सेवाकर (जीएसटी) कायद्याची अंमलबजावणी एप्रिल २०१६ या मुदतीत होण्याची शक्यता अंधुक असली, तरी लोकांना या कायद्याचा फायदा मिळावा यासाठी सरकार या अंमलबजावणीसाठी पर्यायी मार्ग शोधून काढेल,.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा