काँग्रेसने घराणेशाहीवरून भाजपासह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला आहे. जे मोदी घराणेशाहीमुळे राजकारणासह प्रत्येक क्षेत्राचा गळा आवळला जात असल्याचं बोलतात त्यांच्या पक्षात २००९ मध्ये १२ टक्के खासदार नेत्यांच्या कुटुंबातून होते. आता सद्यस्थितीत भाजपातील २५ टक्के खासदार नेत्यांच्या घरातील आहेत, असा आरोप काँग्रेसने केलाय. खोटं बोललं जात आहे. जनतेला या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत, असंही काँग्रेसने म्हटलं.

काँग्रेसने ट्वीटमध्ये म्हणाले, “भाजपाचे २५ टक्के खासदार नेत्यांच्या घरातून आलेत. अनेक केंद्रीय मंत्री देखील राजकीय घराण्यांमधून आले आहेत. असं असताना भाजपाने घराणेशाहीवर बोलणं समजण्यापलीकडचे आहे.”

काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराणेशाहीवरील टीकेवर निशाणा साधला आहे. मोदींनी घराणेशाही राजकारणच नाही तर प्रत्येक क्षेत्राच्या प्रगतीला अडथळा ठरत असल्याचं वक्तव्य केलं होतं. हेच नमूद करत काँग्रेसने २००९ पासून आजपर्यंतच्या भाजपामधील घराणेशाहीची आकडेवारी सांगितली आहे.

हेही वाचा : विश्लेषण : राज्यसभा निवडणुकीत पराभूत कोण होणार?

काँग्रेसने ट्विटरवर शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, २००९ मध्ये भाजपात १२ टक्के खासदार नेत्यांच्या कुटुंबातील होते. हे प्रमाण वाढून आता सद्यस्थितीत २५ टक्के खासदार नेत्यांच्या कुटुंबातील आहेत.

Story img Loader