सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींबाबत काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला असून, विविध वर्गवारीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४० टक्के वाढीची मागणी केली आहे.
सातव्या वेतन आयोगाने केलेल्या शिफारशींपैकी बहुसंख्य शिफारशींबाबत केंद्र सरकारी कर्मचारी नाराज असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते अजय माकन यांनी सांगितले.
पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगाने कर्मचाऱ्यांना ४० टक्के वाढ दिलेली असताना आता केवळ १४.२९ टक्के इतकीच वाढ मिळणे दुर्दैवी आहे, असे नमूद करून माकन यांनी सातव्या वेतन आयोगातील अनेक त्रुटींकडे लक्ष वेधले.

Story img Loader