Amit Shah Remark on Ambedkar: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधानावरील चर्चेदरम्यान मंगळवारी राज्यसभेत केलेली एक टिप्पणी वादात अडकली आहे. काँग्रेसने या टिप्पणीवर आक्षेप घेतला असून अमित शाह यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी किती राग आहे, हे अमित शाह यांच्या विधानावरून कळून येते, अशी टीका काँग्रेसने केली.

अमित शाह राज्यसभेत भाषण करताना म्हणाले, “आजकाल आंबेडकरांचे नाव सारखे सारखे घेणे ही फॅशन झाली आहे. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर असा जप काही लोक करत असतात. एवढ्या वेळा जर देवाचे नाव घेतले तर एखाद्याला स्वर्गात जागा मिळेल.” या विधानाआधी अमित शाह म्हणाले होते की, आंबेडकरांचे नाव तुम्ही १०० वेळा जरी घेतले, तरी तुम्हाला आंबेडकरांविषयी काय वाटते, हे मी सांगतो.

evm scam india alliance
ईव्हीएमचा वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात! ‘इंडिया’आघाडी याचिका दाखल करण्याची शक्यता
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
Impeachment motion against Yoon Suk Yeol rejected south Korea
दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांना दिलासा; यून सुक येओल यांच्याविरोधात महाभियोगाचा ठराव नामंजूर
pune session court latest marathi news
योगी आदित्यनाथ यांच्या सभेत गोंधळ घालणाऱ्या एकाचा जामीन फेटाळला, महिला पोलिसाला शिवीगाळ
Yogi Adityanath on Bangladesh
Yogi Adityanath: “बाबरनं ५०० वर्षांपूर्वी अयोध्येत जे केलं, तेच आज बांगलादेशात होतंय”, थेट DNA चा उल्लेख करत योगी आदित्यनाथांची टीका
Uday Samant Post About Loksatta
Uday Samant : “‘लोकसत्ता’चा लोगो वापरुन खोडसाळ पोस्ट”, ‘त्या’ पोस्टवर काय म्हणाले उदय सामंत?
Two arrested for attacking Chandrakant Tingre Pune print news
चंद्रकांत टिंगरे यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोघांना अटक; शरद पवार गटात प्रवेश केल्याने हल्ला केल्याची कबुली

अमित शाह यांच्या टिप्पणीनंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट टाकून या विधानाचा निषेध केला आहे. “ज्यांना मनुस्मृतीवर विश्वास आहे, त्यांना आंबेडकरांची अडचण असते”, अशी पोस्ट राहुल गांधी यांनी केली.

काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनीही अमित शाह यांच्या भाषणावर जोरदार टीका केली. भाजपा आणि संघाच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी किती घृणा आहे, हे अमित शाह यांच्या विधानातून दिसून येते. आंबेडकरांच्या नावाचीही त्यांना अडचण वाटते. हे तेच लोक आहेत, ज्यांचे पूर्वज आंबेडकरांचे पुतळे जाळत आहेत. जनतेने यांना धडा शिकवल्यानंतर आता त्यांना बाबासाहेब आठवत आहेत.

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही अमित शाह यांच्यावर टीका केली. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही अमित शाह यांच्यावर टीका केली. “भाजपा आणि संघाने राष्ट्रध्वजाचा विरोध केला. अशोक चक्राला त्यांचा विरोध होता. संविधानाऐवजी त्यांना मनुस्मृती लागू करायची होती, मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी हे होऊ दिले नाही. म्हणूनच तुम्ही बाबासाहेबांचा द्वेष करता का?”, असा सवाल खरगे यांनी उपस्थित केला.

Story img Loader