Dr. Manmohan Singh Memorial Space : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी ९२ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्यासाठी स्वंतत्र स्मारक उभारावं अशी मागणी आता काँग्रेसकडून केली जातेय. काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश पांडे यांनी याबाबत सांगितलं की, पक्षप्रमुख मल्लिकार्जून खरगे आणि मनमोहन सिंग यांच्या कुटुंबीयांची सरकारबरोबर चर्चा सुरू आहे.
खरगे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी २८ डिसेंबर रोजी स्मारकासाठी जागा मागितली. मी विनंती केली की डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर एका पवित्र ठिकाणी अंत्यसंस्कार व्हावेत. जिथे स्मारकही उभारता येईल, असं खरगे यांनी मोदींना पत्र लिहिलं आहे. हा प्रस्ताव राजनेते आणि माजी पंतप्रधानांच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराच्या ठिकाणी स्मारके बनबवून त्यांचा सन्मान करण्याच्या परंपरेशी सुसंगत आहे. मात्र केंद्र सरकारकडून अद्याप त्यांच्या मागणीला प्रतिसाद दिलेला नाही. महत्त्वाचं म्हणजे, काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील युपीए सरकारने स्वतंत्र स्मारकाच्या जागेच्या मागणीत अडथळा आणला होता. जागेच्या कमतरतेचया पार्श्वभूमीवर यूपीए सरकारने २०१३ मध्ये राज घाट येथे राष्ट्रीय स्मृती स्थळ सामायिक स्मारक मैदान स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
आज कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge ने प्रधानमंत्री जी और गृह मंत्री से फ़ोन पर बात करके व एक पत्र लिख कर भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की ओर से पुरज़ोर अनुरोध किया कि भारत के सपूत सरदार मनमोहन सिंह जी का अंतिम संस्कार व स्मारक स्थापित करना ही उनको सच्ची श्रद्धांजलि होगी। pic.twitter.com/pNxh5txf0b
— Congress (@INCIndia) December 27, 2024
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव आज त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आणण्यात आले. उद्या सकाळी ८ वाजता त्यांचे पार्थिव काँग्रेस मुख्यालयात नेले जाईल त्यानंतर सकाळी ८.३० ते ९.३० दरम्यान सर्वांना मनमोहन सिंह यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. दरम्यान उद्या सकाळी ९. ३० वाजता काँग्रेस कार्यालयातून अंतयात्रेला सुरुवात होणार आहे.
कधी होणार अंत्यसंस्कार?
दरम्यान मनमोहन सिंग यांच्या कन्या आज सायंकाळी अमेरिकेतून दिल्लीत दाखल होणार आहेत. त्यामुळे उद्या (शनिवार) मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.
कुठे होतात माजी पंतप्रधानांवर अंत्यसंस्कार?
देशाच्या माजी पंतप्रधानांचे अंत्यसंस्कार दिल्लीतील विशेष स्मृतीस्थळांवर केले जातात. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या माजी पंतप्रधानांवर दिल्लीतील राजघाट संकुलात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्याचबरोबर अनेक माजी पंतप्रधानांसाठी स्वतंत्र समाधी स्थळेही बांधली आहेत. असे असले तरी, अंत्यसंस्कार करण्याची पद्धत मृत व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या धार्मिक मान्यतेनुसार आहे.
सामान्यतः, माजी पंतप्रधानांचे अंत्यसंस्कार दिल्लीत होतात, परंतु त्यांचे अत्यंसंस्कार त्यांच्या गृहराज्यात देखील होऊ शकतात. त्यांच्या अंत्यसंस्काराला राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, कॅबिनेट मंत्री आणि देशातील इतर मान्यवर उपस्थित असतात.