बहुप्रतीक्षित आणि वादग्रस्त अन्नसुरक्षा विधेयक लोकसभेत संमत झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने काँग्रेसला याचे श्रेय मिळू नये यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत़ देशात काँग्रेस सर्वाधिक काळ सत्तेत असल्याने कुपोषण आणि उपासमार संपविणे हे त्यांचे कर्तव्यच असल्याचा खोचक टोला भाजपकडून लगाविण्यात आला आह़े
हे विधेयक संमत करण्यात आले असले तरीही देशात अद्याप असंख्य लोक भुकेने आणि कुपोषणाने कण्हत आहेत़ याची जाणीव काँग्रेसने ठेवावी़ देशात सर्वाधिक काळ सत्तेवर राहणाऱ्या काँग्रेसचीच ही जबाबदारी आहे, अशी टीका भाजपचे राज्यसभेतील उपनेते रवी शंकर प्रसाद यांनी केली आह़े दुष्काळ, भूकंपासारख्या परिस्थितीत अन्न-धान्यपुरवठा कसा केला जाणार याबाबत या विधेयकात काहीही ठोस तरतूद नाही़ भाजपने केलेल्या गरिबांना अधिकाधिक लाभ देणाऱ्या या विधेयकावरील अनेक सुधारणा फेटाळण्यात आल्या असा आरोपही त्यांनी केला़ संसदीय पक्षाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होत़े
या विधेयकाच्या प्रभावी कार्यवाहीच्या आड कोणकोणत्या त्रुटी येणार आहेत़ याचीही चर्चा या बैठकीत झाल्याची माहिती प्रसाद यांनी दिली़ स्तनदा माता आणि दुसऱ्या एखाद्या योजनेच्या लाभधारी असणाऱ्या अनेकांना या विधेयकाचा लाभ मिळणार नाही, याची जाणीवही त्यांनी या वेळी करून दिली़
देशाच्या आर्थिक स्थितीबद्दल भाजपकडून यूपीएला संसदेत धरेवर धरण्यात येईल, असेही त्यांनी सांगितल़े
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा