आज २८ डिसेंबर २०२१ रोजी राष्ट्रीय काँग्रेसचा १३७वा स्थापना दिन आहे. २८ डिसेंबर १८८५ रोजी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली होती. यानिमित्ताने देशभर काँग्रेस पक्षातर्फे कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात दिल्लीतही स्थापना दिनाचा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सोनिया गांधी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात पोहोचल्या असता त्यांच्यासोबत एक विचित्र घटना घडली. पाहुयात सोनिया गांधी यांच्यासोबत नेमकं काय घडलं…
या कार्यक्रमाच्यावेळी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी झेंडा फडकवण्यासाठी दोरी खेचली पण झेंडा फडकण्याऐवजी खांबावरून खाली पडला आणि त्यांच्या हातातच आला. तेव्हा संबंधित कार्यकर्ते यांनी पुन्हा झेंडा नीट लावला आणि मग ध्वजारोहण पार पडले. दरम्यान, सोनिया गांधी यांचा ध्वजारोहणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यावर बऱ्याच प्रतिक्रिया उमटत आहेत.