पाकिस्तानला दिलेल्या आकस्मिक भेटीची माहिती मोदींनी ट्विटरवरून देणे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसने दिली आहे. पाकिस्तान भेट हा मुद्दा गंभीर आहे. तिची अशा प्रकारे वाच्यता होणे नको होते, असे सांगत काँग्रेसने या भेटीवर प्रश्नचिन्ह लावले. पंतप्रधानांच्या भेटीची माहिती आम्हाला ट्विटरवरून कळते हे दुर्दैवी आहे. भारत व पाकिस्तानचे संबंध फारसे चांगले नसतानाही दुसऱ्या देशावरून परत येताना मोदी पाकिस्तानमध्ये थांबतातच कसे, असा सवाल प्रवक्ते अजयकुमार यांनी केला. अशा मुद्दय़ांवर मोदी कुणाला विश्वासात का घेत नाहीत, याबाबतही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

Story img Loader