नवी दिल्ली : प्राप्तिकर विभागाने काँग्रेसला पुन्हा एकदा कर थकबाकीची नोटीस बजावली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१४-१५ ते २०१६-१७ या मूल्यांकन वर्षांसाठी १,७४५ कोटी रुपये कर थकबाकी असल्याचे नोटिशीत म्हटले आहे. यामुळे आता काँग्रेसकडे प्राप्तिकराच्या करथकबाकीची एकूण ३,५६७ कोटी रुपयांच्या घरात गेली आहे.

हेही वाचा >>> भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा थांबणार नाही! मेरठच्या सभेत पंतप्रधानांचा इंडिया आघाडीला इशारा

oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
restrictions on sale of railway platform tickets lifted from 9 november
Railway Platform Tickets Available : फलाट तिकीट पुन्हा उपलब्ध

प्राप्तिकर विभागाने राजकीय पक्षांना उपलब्ध असलेली करसवलत समाप्त केली असून पक्षाच्या संपूर्ण निधीसंकलनांवर कर आकारला आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांवर टाकलेल्या छाप्यांदरम्यान आढळलेल्या डायरींमध्ये नोंद असलेल्या तृतीय पक्षांकडून जमा झालेल्या पैशांवरही काँग्रेसला कर आकारण्यात आला आहे. त्याच तृतीय पक्षांनी भाजपला दिलेल्या पैशांवर कोणताही कर आकारलेला नसल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला होता. आपल्याला प्राप्तिकर विभागाकडून पुन्हा नोटीस बजावण्यात आली असून जवळपास १,८२३ कोटी रुपये भरण्यास सांगण्यात आले आहे अशी माहिती त्या वेळी काँग्रेसकडून देण्यात आली. 

तीन वर्षांतील थकबाकी

२०१४-१५ या मूल्यांकन वर्षांसाठी ६६३ कोटी रुपये, २०१५-१६साठी ६६४ कोटी रुपये आणि २०१६-१७साठी ४१७ कोटी रुपयांची मागणी प्राप्तिकर विभागाने काँग्रेसकडे केली आहे.