काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला असून, प्राथमिक सदस्यत्वही सोडलं आहे. गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून आपली नाराजी जाहीर केली. या पत्रात त्यांनी राहुल गांधींवरील आपली नाराजी बोलून दाखवली असून, काही गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधींमध्ये अपरिपक्वता असून त्यांना पक्षातील सल्लागार यंत्रणा उद्धवस्त केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जाणून घ्या गुलाम नबी आझाद यांच्या पत्रातील पाच महत्त्वाचे मुद्दे –
१) राहुल गांधी यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर आणि खासकरुन जानेवारी २०१३ मध्ये त्यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर दुर्दैवाने, याआधी अस्तित्वात असलेली सल्लागार यंत्रणा पूर्णपणे नष्ट करण्यात आली.
२) पक्षाच्या अनुभवी नेत्यांना बाजूला सारुन कोणताही अनुभव नसणारे पक्षाचं कामकाज चालवू लागले.
काँग्रेसला मोठा झटका! गुलाम नबी आझाद यांचा राजीनामा, सदस्यत्वही सोडलं
३) राहुल गांधींनी प्रसारमाध्यमांसमोर सरकारी अध्यादेश फाडला हे त्यांच्या अपरिपक्वतेचं उदाहरण होतं.
४) राहुल गांधींच्या या बालिश वर्तवणुकीने पंतप्रधान आणि केंद्र सरकारचे सर्व अधिकार झुगारले. २०१४ मध्ये झालेल्या युपीए सरकारच्या पराभवात या कृतीचा सर्वात मोठा वाटा होता.
काँग्रेसला मोठा धक्का! गुलाम नबी आझाद बंडखोरीच्या तयारीत? नियुक्तीनंतर काही तासातच राजीनामा
५) २०१४ मध्ये तुमच्या आणि खासकरुन राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसचा अत्यंत अपमानास्पदरित्या दोन लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. २०१४ ते २०२२ दरम्यान झालेल्या ४९ पैकी ३९ विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाचा पराभव झाला. पक्षाने फक्त चार विधानसभा निवडणुका जिंकल्या असून, सहा ठिकाणी युतीमध्ये होतो. दुर्दैवाने, आज काँग्रेस आज फक्त दोन राज्यांमध्ये सत्तेत असून, इतर दोन राज्यांमध्ये युतीमधील अत्यंत किरकोळ भागीदार आहे.
६) कार्यसमितीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी संतापाच्या भरात पायउतार होताना आणि पक्षासाठी आपल्या आयुष्य समर्पित करणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांचा अपमान केल्यानंतर तुम्ही हंगामी अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली. हे पद गेल्या तीन वर्षांपासून तुम्ही कायम राखलं आहे. सर्वात वाईट म्हणजे, युपीए सरकारची संस्थात्मक अखंडता नष्ट कऱण्यासाठी कारणीभूत ठरलेलं ‘रिमोट कंट्रोल मॉडेल’ आता काँग्रेसमध्ये अवलंबलं जात आहे. तुम्ही केवळ नाममात्र व्यक्ती असताना सर्व महत्त्वाचे निर्णय राहुल गांधी किंवा त्याहून वाईट म्हणजे त्यांचे सुरक्षा रक्षक आणि खासगी सहाय्यक घेत होते.