PM Narendra Modi speech in Parliament: काँग्रेस पक्षाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल राग होता. त्यांच्या प्रत्येक कृतीवर काँग्रेसकडून नाराजी व्यक्त केली जायची. याचे ऐतिहासिक कागदपत्रे उपलब्ध आहेत. आंबेडकरांना दोनवेळा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी काँग्रेसने काय काय नाही केले. एवढेच नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारत रत्न पुरस्कार देण्याच्या पात्रतेचेही ते समजत नव्हते, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत बोलताना केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर बोलत असताना मोदींनी काँग्रेसवर आरोपींच्या फैरी झाडल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या देशातील सर्व समाजाच्या लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भावनेचा आदर केला. त्यांना सन्मान दिला. त्यानंतर आज नाईलाजाने काँग्रेसला जय भीम बोलावे लागत आहे. जय भीम बोलताना त्यांचे तोंड सुकते. काँग्रेस रंग बदलण्यात चांगलीच पटाईत आहे. ते इतक्या वेगात आपला मुखवटा बदलतात, हे यातून सिद्ध होते, अशीही टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली.

म्हणून काँग्रेसची दुर्दशा झाली…

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, आम्ही ज्याप्रमाणे ‘सबका साथ, सबका विकास’ ही घोषणा दिली. त्याप्रमाणे काँग्रेसने नेहमीच दुसऱ्याची रेषा छोटी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच त्यांनी अनेक सरकार अस्थिर केले. इतर पक्षांचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना अस्थिर केले. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसबरोबर असणारे पक्षही पळून जात आहेत. काँग्रेसच्या सवयींमुळेच आज देशातील सर्वात जुन्या पक्षाची दुर्दशा झाली आहे. मी आज काँग्रेसला न मागता सल्ला देतो की, त्यांनी दुसऱ्याची रेषा छोटी करण्यापेक्षा स्वतःची रेषा मोठी करण्यासाठी मेहनत घ्यावी. म्हणजे देशातील जनता तुमचा पुन्हा विचार करेल.