दहशतवादाचा मुकाबला करण्यास कॉंग्रेस सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं असून भारतीय जनता पक्षाला बॉम्बस्फोटाचं राजकारण करायचं नाही, असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह येथे म्हणाले. बिहारमधील महाबोधी मंदिर व आजूबाजूच्या भागात रविवारी सकाळी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर आज (मंगळवार) राजनाथ सिंह, राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते अरूण जेटली, रविशंकर प्रसाद आणि भाजपचे बिहारमधील नेते नंदकिशोर यांनी या परिसराला भेट दिली.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, असं राजनाथ सिंह यावेळी म्हणाले. दहशतवादाचा सामना करण्यासाठी तपास यंत्रणांमध्ये समन्वय असण्य़ाची आवश्यकता आहे. केंद्र सरकारने आयबी, सीबीआयसारख्या यंत्रणाचा दुरूपयोग न करता त्यांचा समन्वय साधून दहतवादाचा सामना करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना आखाव्यात, असंही राजनाथ सिंह पुढे म्हणाले.
बॉम्बस्फोटांसारख्या घटना घडू नयेत यासाठी बोधगया सारख्या बौध्द धर्मस्थळांसाठी केंद्र सरकार विशेष उपाययोजना करेल, अशी आशा राजनाथ सिंह यांनी यावेळी व्यक्त केली. अशा प्रकारच्या घटनांचा सामना करण्यासाठी सरकारकडे सर्वसमावेशक आराखडा असला पाहिजे, असं सिंह म्हणाले.
राज्य सरकार एकट्याने दहशतवाद आणि माओवाद्यांचा मुकाबला करू शकत नाही, त्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला विश्वासात घेऊन आवश्यक ते प्रयत्न केले पाहिजेत असंही सिंह पुढे म्हणाले. आम्ही सर्वांनी बुध्दाच्या मूर्तीसोमोर हात जोडून संपूर्ण भारतात आणि विश्वात शांती पसरू दे अशी प्रार्थना केल्याचंही सिंह यांनी यावेळी नमूद केलं.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा