न्युझिलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. तशी घोषणा खुद्द आर्डर्न यांनीच केली आहे. त्यांनी अचानक घेतलेल्या या निर्णायानंतर जगभरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हाच मुद्दा घेऊन काँग्रेसेचे नेते जयराम रमेश यांनी भारताला जेसिंडा आर्डर्न यांच्यासारख्या नेत्यांची गरज आहे, असे विधान केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> Twitter Layoffs :ट्विटरमध्ये आणखी कर्मचारीकपात? लवकरच निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता

निवृत्त व्हा असे म्हणायची वाट पाहू नका

जेसिंडा आर्डर्न यांच्या निर्णयानंतर जयराम रमेश यांनी ट्विटरद्वारे भारतालाही जेसिंडा यांच्यासारख्या नेत्याची गरज विधान केले आहे. “तो निवृत्त का होत आहे, असे लोक विचारत असतील तेव्हाच निवृत्त व्हा. तो निवृत्त का होत नाही, असे म्हणण्याची वाट पाहू नका, दिग्गज क्रिकेट समालोचक विजय मर्चंट म्हणाले होते. न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे. भारताच्या राजकारणातही अशाच नेत्यांची गरज आहे,” असे जयराम रमेश म्हणाले आहेत.

हेही वाचा >> न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न देणार राजीनामा; म्हणाल्या, “आता ती वेळ…”

खरा नेता तो आहे, ज्याला पद सोडण्याची योग्य वेळ माहिती असते

न्यूझीलंडमध्ये ऑक्टोंबर महिन्यात सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. गुरुवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत अर्डर्न यांनी आपण निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. “आता ती वेळ आली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी विचार केली की, माझ्याकडं देशाचं नेतृत्व करण्याची शक्ती आहे का? पण मला याचं उत्तर नाही मिळालं. त्यामुळे मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान म्हणून साडेपाच वर्षे खडतर होती. पण, राजकीय नेता देखील शेवटी माणूसच आहे. जोपर्यंत आमच्यावर जबाबदारी होती, ती चोख पाडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी आम्ही केल्या. खरा नेता तो आहे, ज्याला पद सोडण्याची योग्य वेळ माहिती असते. मात्र, याचा अर्थ मी कमकुवत आहे, असा मुळीच नाही,” असे अर्डर्न म्हणाल्या.

हेही वाचा >> “आम्ही चूक केली” म्हणत GoMechanic नं केली ७० टक्के कर्मचारी कपातीची घोषणा!

दरम्यान, अर्डर्न यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. करोना महासाथीच्या काळात त्यांनी न्यूझीलंडचे प्रभावीपणे नेतृत्व केले होते. त्यांनी महासाथीला कुशलतेने हाताळले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress jairam ramesh said india need politicians like new zealand pm jacinda ardern prd
Show comments