चन्नापटना (कर्नाटक) : कर्नाटकातील राजकीय अस्थैर्यासाठी काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल हे पक्ष जबाबदार असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी केला. या दोन्ही पक्षांनी राज्यातील अस्थैर्यात संधिसाधूपणा केला व कर्नाटकला ‘एटीएम’ मानले, अशा पक्षांपासून सावध राहण्याचा इशाराही त्यांनी येथील प्रचार सभेत मतदारांना दिला. गेल्या काही दिवसांतील मोदींची कर्नाटकमधील पाचवी प्रचारसभा होती.

चन्नापटना येथून २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या एच. डी. कुमारस्वामी यांनी विजय मिळवला होता. त्यांनी त्यावेळी त्यांनी भाजपचे उमेदवार सी. पी. योगेश्वर यांना हरवले होते. येथून आता ते पुन्हा निवडणूक लढवत आहेत. धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या या बालेकिल्ला असलेल्या चन्नापटना येथील एका प्रचारसभेत बोलताना मोदी म्हणाले, की काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल लोकांना दाखवण्यासाठी स्वतंत्र पक्ष आहेत. मात्र, प्रत्यक्षात ते मनाने एकत्रच आहेत. संसदेत ते परस्परांची मदत करत असतात. या दोन्ही पक्षांत घराणेशाही असून, भ्रष्टाचारास प्रोत्साहन देत असतात. कर्नाटकवासीयांनी दीर्घ काळ अस्थिर सरकारांची नाटकं सहन केली.

CM Devendra Fadnavis Nagpur Interview
Devendra Fadnavis : कठोर राजकारणी कोण मोदी की अमित शाह? देवेंद्र फडणवीसांनी काय उत्तर दिलं?
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
ec hearing against district collector dr sachin ombase for obstructing election process
लोकसभा निवडणुकीत जिल्हाधिकार्‍यांचा सावळा गोंधळ; निवडणूक आयोगाकडून दखल; जिल्हाधिकार्‍यांची सुनावणी
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : अजित पवारांच्या पक्षाकडून ऑफर आली का? विचारताच बजरंग सोनावणे म्हणाले, “आम्ही आठही खासदार….”
MLA Satej Patil urged workers after assembly defeat
विधानसभा अपयशाने खचणार नाही ; उभारी घेऊ सतेज पाटील
Tamil Nadu, Governor Ravi, Governor Ravi address,
विश्लेषण : तमिळनाडूत सलग तिसऱ्या वर्षी राज्यपाल रवी यांचा अभिभाषणापूर्वीच सभात्याग, राज्यपालांचे अभिभाषण बंधनकारक असते का?
Ramdas Athawale, Ramdas Athawale unhappy with BJP,
“काँग्रेसने सात विधानपरिषदेच्या जागा दिल्या होत्या परंतु, भाजपसोबत बारा वर्षांपासून युती करूनही…”, केंद्रीय मंत्र्यांचे विधान चर्चेत
Loksatta Shahrbat Municipal elections Political parties in Pune Voters Pune print news
शहरबात (अ) राजकीय : स्वान्तसुखाय’ पुण्यातील राजकीय पक्ष

३०५ कोटी रुपयांहून अधिकची जप्ती
बंगळूरु : निवडणूक होत असलेल्या कर्नाटकमध्ये २९ मार्चला आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून देखरेख ठेवणाऱ्या यंत्रणांनी आतापर्यंत रोख व इतर वस्तू मिळून ३०५ कोटी रुपयांहून अधिकची जप्ती केली असल्याचे निवडणूक आयोगाने रविवारी सांगितले. ३०५.४३ कोटी रुपयांच्या एकूण जप्तीत रोख रक्कम (११० कोटी रुपये), दारू (७४ कोटी), सोने व चांदी (८१ कोटी), मोफत भेटवस्तू (२२ कोटी) आणि औषधे/ अमली पदार्थ यांचा समावेश आहे.

Story img Loader