Congress KC Venugopal On Nitish Rane mini Pakistan remark : काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी मंगळवारी महाराष्ट्राचे भाजपाचे नेते आणि महायुती सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणेंच्या वक्तव्याबद्दल जराही लाज वाटत असेल तर त्यांना तात्काळ त्यांना बडतर्फ करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“भाजपा ठराविक कालांतराने केरळ विरोधात जहरी वक्तव्य करण्यासाठी द्वेष पसरवणाऱ्या नेत्यांना पुढे करते. मिनी पाकिस्तान यासारख्या शब्दांचा वापर केल्याने त्यांच्या मनामध्ये केरळमधील लोकांबद्दल किती खोलपर्यंत द्वेष भरला आहे हे दिसून येते”, असे मत वेणुगोपाल यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये व्यक्त केले आहे.

“संपूर्ण जगासाठी केरळ हे एक आदर्श राज्य आहे,ज्याने मानवी विकास निर्देशांकात विशेषतः शिक्षण, आरोग्य सेवा आणि रहाणीमानाचा स्तर यामध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. हजार वर्षांपासून केरळ हे सर्व धर्म आणि पंथांच्या सांप्रदायिक सौहार्द आणि बंधुत्वाचे आदर्श उदाहरण ठरले आहे. समतावाद, सर्वसमावेशकता आणि सामाजिक न्यायाचा पुरस्कार करणाऱ्या श्री नारायण गुरू, चट्टम्पि स्वामीकल आणि महात्मा अय्यंकाली यांच्या भूमीसाठी अपमानास्पद भाषा वापरणे, हे भाजपा आपल्याच देशवासियांना कसे क्षुल्लक समजते याचे प्रतीक आहे”, असेही वेणुगोपाल म्हणाले आहेत.

वेणुगोपाल यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. “राणे यांच्या वक्तव्याबद्दल जर पंतप्रधान मोदींना जराही लाज वाटत असेल, तर त्यांनी तात्काळ त्यांना बडतर्फ करावे”.

“केरळमधील जनता या कारणासाठी भाजपाला नाकारले आहे आणि भविष्यात कधी स्वीकारणारही नाहीत. त्यांना (भाजपा) या राज्यातील सौहार्दपूर्ण वातावरणाचे सौंदर्य समजत नाही”, असेही वेणुगोपाल म्हणाले आहेत.

हेही वाचा >> संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेले वाल्मिक कराड पोलिसांना शरण; स्वतः व्हिडीओ प्रसिद्ध करत म्हणाले, “राजकीय द्वेषापोटी..”

वाद काय आहे?

नितेश राणे यांनी पुण्यातील एका रॅलीदरम्यान केरळ राज्याचा उल्लेख ‘मिनी पाकिस्तान’ असा केला होता. तसेच त्यांनी काँग्रेस नते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे दहशतवाद्यांच्या पाठिंबा मिळाल्याने येथे निवडून येतात अशा आशयाचे विधान केले होते. राणे यांच्या या विधानानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती. वाद पेटल्यानंतर राणे यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देखील दिले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress kc venugopal demad pm modi to sack nitesh rane over kerala mini pakistan remark rak