छत्तीसगडमधील रायपूर येथील काँग्रेसच्या ८५ व्या अधिवेशनात काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपल्या राजकीय संन्यासाबाबत सूचक विधान केले. माझ्या प्रवासाचा समारोप काँग्रेससाठी टर्निंग पॉईंट ठरलेल्या ‘भारत जोडो यात्रे’ने झाला, याचे मला जास्त समाधान आहे, असे विधान सोनिया गांधी यांनी केले. या विधानानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. यावरच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयं सिंह यांनी भाष्य केले आहे. सोनिया गांधींनी केलेले वक्तव्य फक्त भारत जोडो यात्रेसंदर्भातच होते, असे दिग्विजय सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा >> औरंगाबादच्या नामांतरावर रोहित पवारांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “बेरोजगारी, शेतकरी…”

Draupadi Murmu and sonia gandhi
Sonia Gandhi : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या भाषणावर सोनिया गांधींची टीका, म्हणाल्या, “भाषण करताना…”
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Sevagram Rahul Gandhi BJP and RSS Nagpur Election
लोकजागर : फसलेले ‘चिंतन’!
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”
Rahul Gandhi list on dishonest people
‘आप’च्या बेईमानांच्या यादीत राहुल गांधींचाही समावेश, भाजपानंतर आता थेट काँग्रेसही लक्ष्य
Nitish Kumar On Manipur Politics
Manipur Politics : नितीश कुमार यांचा पक्ष मणिपूरमध्ये एनडीएमध्ये सहभागी असणार की नाही? संभ्रमाच्या परिस्थितीमुळे चर्चांना उधाण
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil : “वाळूच्या गाड्या चालू द्या, काही फरक पडत नाही, सगळे आपलेच लोक”, राधाकृष्ण विखे पाटलांचं धक्कादायक विधान
A youth from Bihar files a case against Rahul Gandhi seeking Rs 250 as compensation, highlighting the ongoing legal dispute.
Rahul Gandhi : “ते विधान ऐकून धक्का बसला अन् हातातून दुधाची बादली पडली”, २५० रूपयांसाठी राहुल गांधींविरोधात तरुणाची याचिका

दिग्विजय सिंह काय म्हणाले?

“सोनिया गांधी यांनी उदयपूरमध्ये काँग्रेसच्या चिंतन शिबिरात भारत जोडो यात्रेसंदर्भात घोषणा केली होती. हीच यात्रा यशस्वीरित्या पार पडली, असे सोनिया गांधी यांना सांगायचे होते,” असे दिग्विजय सिंह यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >> सोनिया गांधी निवृत्त होणार? रायपूरच्या अधिवेशनात केले सूचक विधान; म्हणाल्या “माझ्या प्रवासाचा समारोप…”

सोनिया गांधी काय म्हणाल्या?

सोनिया गांधी यांनी रायपूरमधील काँग्रेसच्या अधिवेशनात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना संबोधिक केले. सोनिया गांधी यांनी राजकीय संन्यास घेणार असल्याचेही यावेळी संकेत दिले. “डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली २००४ आणि २००९ साली लोकसभा निवडणुकीत आपला विजय झाला. यामुळे मी वैयक्तिकरित्या समानाधी आहे. मात्र माझ्या प्रवासाचा समारोप काँग्रेससाठी टर्निंग पॉईंट ठरलेल्या ‘भारत जोडो यात्रे’ने झाला, याचे मला जास्त समाधान आहे,” असे सोनिया गांधी म्हणाल्या.

हेही वाचा >>मोठी बातमी! पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय मंत्र्याच्या ताफ्यावर हल्ला; परिसरात तणावाची स्थिती

मोदी सरकारने अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली

सोनिया गांधी यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारवरही टीका केली. “भारत देश तसेच काँग्रेससाठी हा आव्हानात्मक काळ आहे. भाजपा, आरएसएसने देशातील प्रत्येक संस्था ताब्यात घेतली आहे. तसेच या संस्था नेस्तनाबूत केल्या आहेत. काही उद्योगपतींच्या हिताचे निर्णय घेऊन मोदी सरकारने भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे,” अशी टीका सोनिया गांधी यांनी केली.

Story img Loader