दिग्विजयसिंह यांचे सरसंघचालकांना आवाहन

नवी दिल्ली : सर्व भारतीयांचा डीएनए सारखाच आहे या आपल्या मताशी सरसंघचालक मोहन भागवत प्रामाणिक असतील तर भाजपच्या ज्या नेत्यांनी निष्पाप मुस्लिमांचा छळ केला त्यांना पदावरून हटविण्याचे आदेश त्यांनी द्यावे, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी सोमवारी येथे सरसंघचालकांना दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तथापि, भागवत असे करणार नाहीत कारण त्यांचे शब्द आणि कृती यांच्यात फरक आहे, असेही दिग्विजयसिंह यांनी म्हटले आहे. गझियाबादमध्ये रविवारी मुस्लीम राष्ट्रीय मंचने आयोजित केलेल्या ‘हिंदुस्थान फर्स्ट हिंदुस्थानी बेस्ट’ या कार्यक्रमात भागवत यांनी झुंडबळींमध्ये सहभाग असलेले हिंदुत्वविरोधी आहेत, असे मत व्यक्त केले होते.

भागवतजी, तुम्ही तुमची मते तुमचे शिष्य, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे कार्यकर्ते यांना सांगणार का, असा सवाल दिग्विजयसिंह यांनी  केला. एआयएमआयएमचे नेते ओवेसी यांनीही भागवत यांच्यावर टीका केली. ज्या गुन्हेगारांचा झुंडबळींमध्ये सहभाग असतो त्यांना गाय आणि म्हैस यांच्यातील फरक कदाचित माहीतही नसेल, मात्र जुनैद, अकलाख, पेहलू, रकबर, अलीमुद्दीन ही नावेच त्यांच्यासाठी हत्या करण्यासाठी पुरेशी आहेत, असे ओवेसी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader digvijay singh statement on mohan bhagwat remarks on muslim zws