उत्तरप्रदेशमधील बीजनोर येथील स्थानिक काँग्रेस नेत्याने इतर पाच जणांसह एका विधवा महिलेवर सामुहिक बलात्कार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याद्रम चंडेल या काँग्रेस नेत्यासह ओमपाल, रघु, रिझवान, सलमान आणि आखणी अज्ञात इसम यांच्यावक ३९ वर्षीय विधवा महिलेवर सामुहिक बलात्कार केल्याप्रकरणी तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
पीडित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, चंडेल आणि त्याच्या इतर पाच सहकाऱयांनी तिच्यावर शासकीय योजनेतून घर देण्याचे आमिष दाखवून घर दाखविण्याच्या बहाण्याने  तिच्यावर एका कारमध्ये बलात्कार केला. पोलिसांनी पीडित महिलेची तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.