जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी राज्यसभेसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या मदतीने पुन्हा एकदा विजय मिळविला आहे. या निवडणुकीत पीडीपीला दोन तर भाजपला एक जागा मिळाली आहे.

गुलाम नबी आझाद यांच्यासह पीडीपीचे फयाज अहमद मिर आणि नझीर अहमद लावे तर भाजपचे समशेरसिंह मनहास विजयी झाले. भाजप-पीडीपी आणि काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स यांनी जागावाटप सूत्र ठरवून स्वतंत्रपणे निवडणूक लढविली.
दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीत पीडीपी-भाजप आघाडी झाल्याचे स्पष्ट झाले असल्याने आता दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करावे आणि जनतेला जाचातून वाचवावे, असे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

Story img Loader