राहुल गांधी हेच २०२४ मध्ये काँग्रेसेचे पतंप्रधान पदाचे उमेदावार असतील, असं विधान काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कलमनाथ यांनी केले आहे. तसेच त्यांनी ‘भारत जोडो’ यात्रेवरून राहुल गांधी यांचे कौतुकही केले. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले कमलानाथ?
“इतिहासात आजपर्यंत कोणीही ‘भारत जोडो’ इतकी मोठी पदयात्रा काढली नाही. या देशासाठी जेवढं बलिदान काँग्रेसने दिलं, तेवढं अन्य कोणत्याही राजकीय पक्षाने दिलं नाही. राहुल गांधी हे सत्तेसाठी नाही, तर देशातील गरीब जनतेसाठी राजकारण करतात आणि देशातील जनता कोणलाही सत्तेत बसवू शकते”, अशी प्रतिक्रिया कमलनाथ यांनी दिली. यावेळी २०२४ मध्ये काँग्रेसकडून पंतप्रधान पदाचे उमेदवार कोण असेल? याबाबत विचारलं असता, “२०२४ च्या निवडणुकीदरम्यान राहुल गांधी हे केवळ विरोधीपक्षाचा चेहरा नसेल, तर ते पंतप्रधान पदाचे उमेदवार देखील असतील”, असे ते म्हणाले.
हेही वाचा – गुजरात विजयानंतर आता मिशन कर्नाटक! ‘या’ दोन भागावंर असणार भाजपाचे विशेष लक्ष
पुढे बोलताना त्यांनी काँग्रेस पक्ष सोडणाऱ्यांवरही टीकास्र सोडले. “मी वयक्तिक कोणावरही बोलणार नाही, मात्र, ज्या लोकांनी काँग्रेस पक्ष सोडला त्या गद्दारांना काँग्रेसमध्ये कोणतंही स्थान नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच मध्यप्रदेशमध्ये सत्ता आल्यास काँग्रेस जुनी पेन्शन योजना लागू करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.