काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांच्या पाकिस्तानसंबंधी विधानामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भारताने पाकिस्तानशी संवाद साधावा आणि आपल्या लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन करू नये, अन्यथा पाकिस्तान भारताविरुद्ध अण्वस्त्रे तैनात करू शकतो, असे विधान मणिशंकर अय्यर यांनी केला. काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर हे नेहमीच भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्यावर भर देत आले आहेत. ते म्हणाले की, सरकार पाकिस्तानला कठोर शब्दात सुनावू शकते. परंतु भारत शेजारी राष्ट्राचा आदर करत नसेल तर त्याची आपल्याला मोठी किंमत मोजावी लागू शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘काही निधर्मी वगळता गेल्या १० वर्षांत अनेक भारतीय जातीयवादी झाले’, काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांचे विधान

“पाकिस्तानकडे अणुबाँब आहे. आपल्याकडेही अण्वस्त्र आहेत. पण जर एखाद्या वेड्याने लाहोरवर अणुबाँब टाकण्याचा विचार केला तर त्याचे किरणोत्सर्ग अमृतसरपर्यंत पोहोचायला ८ सेकंदही लागणार नाहीत”, असा इशाराच मणिशंकर अय्यर यांनी दिला. आपण जर पाकिस्तानचा आदर राखला तर तेही शांतता राखतील. पण आपण त्यांना डिवचले आणि एखाद्या माथेफिरूने आपल्यावर अणुबाँब टाकला तर काय होईल? असाही प्रश्न मणिशंकर अय्यर यांनी उपस्थित केला.

सावरकरांनीच देशाचे धर्माच्या आधारे विभाजन केले: मणिशंकर अय्यर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना अय्यर म्हणाले की, विश्वगुरु होण्यासाठी पाकिस्तानबद्दलचे आपले प्रश्न कितीही गंभीर असले तरी ते सोडविण्यासाठी आपण कसे प्रयत्न करतो, हे दाखवावे लागेल. पण दुर्दैवाने मागच्या १० वर्षात आपण कोणतेही कठोर परिश्रम हे प्रश्न सोडविण्यासाठी घेतलेले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी ‘घर मे घुस के मारा’, अशी टिप्पणी प्रचारसभेत केली होती. या टिप्पणीवर बोलत असताना अय्यर यांचे हे विधान समोर आले आहे.

पाकिस्तानने हातात बांगड्या भरलेल्या नाहीत

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना फारुक अब्दुल्ला म्हणाले की, जर संरक्षण मंत्र्यांना पीओके ताब्यात घ्यायचा असेल तर त्यांनी तो घ्यावा. आम्ही त्यांना रोखणारे कोण आहोत? मात्र त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी पाकिस्तानने हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. त्यांच्याकडे अणूबाँब आहे आणि दुर्दैवाने ते त्याचा आपल्या विरोधात वापर करू शकतात, असे ते म्हणाले. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना फारुक अब्दुल्ला म्हणाले, “संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना पीओके ताब्यात घ्यायचा असेल तर त्यांनी तो घ्यावा. आम्ही त्यांना रोखणारे कोण आहोत? मात्र त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी पाकिस्तानने हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. त्यांच्याकडे अणूबाँब आहे आणि दुर्दैवाने ते त्याचा आपल्या विरोधात वापर करू शकतात.”

पाकिस्ताननं हातात बांगड्या भरल्या नसून त्यांच्याकडे अणूबाँब आहेत; फारुक अब्दुल्ला

राजनाथ सिंह काय म्हणाले होते?

एप्रिल महिन्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतात होणाऱ्या विकासाचा दाखला देत म्हटले की, पाकव्याप्त काश्मीरमधील लोक स्वतःहून भारतात सामील होण्यासाठी पुढे येतील. “पाकव्याप्त काश्मीर हा आमचा भाग होता आणि राहिल”, असे विधान राजनाथ सिंह यांनी पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग येथील प्रचार सभेत बोलताना केले होते.

“मला वाटते की पीओके ताब्यात घेण्यासाठी भारताला काहीही करावे लागणार नाही. जम्मू आणि काश्मीरमध्ये ज्या प्रकारे ग्राउंड परिस्थिती बदलली आहे, ज्या प्रकारे या प्रदेशात आर्थिक प्रगती होत आहे आणि ज्या प्रकारे तेथे शांतता परत आली आहे, मला वाटते की पीओकेच्या लोकांकडूनच भारतात विलीन होण्याच्या मागण्या पुढे येतील”, असेही ते म्हणाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader mani shankar aiyar says respect pakistan or they will drop atom bomb kvg