Congress on Madhabi Puri Buch : हिंडेनबर्ग रिसर्चने गेल्या काही दिवसांपूर्वी अदानी समूहावर गंभीर आरोप केले होते. त्या आरोपांचा परिणाम अदानी समुहातील कंपन्यांच्या शेअर्सवर झाला होता. त्यानंतर हिंडेनबर्ग रिसर्चने सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बूच आणि त्यांचे पती धवल बूच यांच्यावरही आरोप केले होते. हिंडेनबर्गच्या आरोपानंतर आर्थिक क्षेत्रापासून राजकीय वर्तुळापर्यंत याचे पडसाद उमटले होते. यातच संसदेच्या लोकलेखा समितीने (PAC) आपल्या वार्षिक कार्यक्रमात ‘सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया’च्या (SEBI) कारभाराचा लेखाजोखा घेण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी माध्यमात होते. त्यामुळे माधबी पुरी बूच यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अशातच माधबी पुरी बूच यांच्यावर काँग्रेसने पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. माधबी पुरी बूच यांच्यावर काँग्रेसने केलेल्या आरोपामुळे मोठी खळबळ उडली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी आज पत्रकार परिषद घेत माधबी पुरी बूच यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही हल्लाबोल करत काही सवाल उपस्थित केले आहेत. “माधबी पुरी बूच यांनी काही कंपन्यांच्या माध्यमातून कोट्यवधींची कमाई केली असून ‘अगोरा’च्या माध्यमातून २ कोटी ९५ लाख रुपये कमावले, तसेच महिंद्रा अँड महिंद्राकडून माधबी पुरी बूच यांचे पती धवल बूच यांना २०१९-२१ च्या दरम्यान ४ कोटी ७८ लाख रुपये मिळाले”, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी केला आहे.
हेही वाचा : Shivraj Singh Chouhan : अटलबिहारी वाजपेयी आणि राहुल गांधींमध्ये फरक काय? शिवराज सिंह चौहान म्हणतात…
प्रधानमंत्री से हमारे सवाल:
— Congress (@INCIndia) September 10, 2024
• क्या आपको पता था कि Agora में माधबी जी की 99% शेयर होल्डिंग है?
• जब आपने माधबी जी को SEBI चेयरपर्सन बनाया, तो क्या आपको किसी एजेंसी ने रिपोर्ट नहीं दी थी?
• क्या आपको जांच एजेंसियों ने नहीं बताया था कि Agora के आर्थिक-व्यावसायिक रिश्ते उन… pic.twitter.com/rokC0FU1WP
काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा काय म्हणाले?
“माधबी पुरी बूच यांनी ‘अगोरा’च्या माध्यमातून २ कोटी ९५ लाख रुपये कमावले. यामध्ये सर्वाधिक ८८ टक्के पैसे महिंद्रा अँड महिंद्राकडून आले. त्याच वेळी माधबी पुरी बूच यांचे पती धवल बूच यांना महिंद्रा अँड महिंद्राकडून २०१९-२१ च्या दरम्यान ४ कोटी ७८ लाख रुपये मिळाले. तेव्हा माधबी पुरी बूच या सेबीच्या पूर्णवेळ सदस्य होत्या. त्यामुळे हे नियमांचं उल्लंघन आहे. या काळात सेबीने महिंद्रा अँड महिंद्राच्या बाजूने अनेक आदेशही जारी केले होते”, असा गंभीर आरोप पवन खेरा यांनी केला.
ते पुढे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आम्ही जाणून घेऊ इच्छितो की, तुम्हाला याबाबत माहिती होतं का? की तुम्हाला माहिती आहे अगोरा ॲडव्हायझरी प्रायव्हेट लिमिटेडचे ९९ टक्के शेअर्स हे माधबी पुरी बूच यांच्याकडे आहेत. मग तुमच्या ‘आयबी’ने तुम्हाला काही रिपोर्ट दिले नव्हते का? किंवा तुमच्याकडे याचा अहवाल होता आणि तुम्हाला वाटलं की हे आता माझी प्रत्येक गोष्ट ऐकतील असंही होऊ शकतं”, असं पवन खेरा यांनी म्हटलं आहे.
“पंतप्रधान मोदी यांच्या सरकारमध्ये एकाही मंत्र्यांमध्ये हे सांगण्याची हिंमत नव्हती की, ज्या सेबीच्या अध्यक्षा आहेत त्यांच्या पतीने चार कोटी ७८ लाख रुपये महिंद्रा अँड महिंद्रामधून कमवले. मग याबाबतचा एकही कागद जर पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंत पोहोचला नाही, तर ही दुर्देवाची गोष्ट आहे की ते पंतप्रधानपदावर कसे बसले? जर याबाबतची सर्व माहिती तुमच्यापर्यंत आली असेल तर मग हे तुम्ही कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहात?”, असा सवाल पवन खेरा यांनी विचारला आहे.
जब आप कहीं नौकरी करते हैं तो वहां कुछ नियम होते हैं, लेकिन माधबी जी ने सभी नियमों को ताक पर रख दिया।
— Congress (@INCIndia) September 10, 2024
• माधबी जी ने Agora के जरिए 2 करोड़ 95 लाख रुपए कमाए
• इसमें सबसे ज्यादा 88% पैसा Mahindra & Mahindra से आया
वहीं, माधबी पुरी जी के पति धवल बुच को साल 2019-21 के बीच में… pic.twitter.com/JRBZRxRHFj
काँग्रेसने कोणते सवाल केले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती आहे का? की सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बूच यांचे ‘अगोरा ॲडव्हायझरी प्रायव्हेट लिमिटेड’मध्ये ९९ टक्के शेअर्स आहेत?
जेव्हा तुम्ही माधबी पुरी बूच यांना सेबीने चेअरपर्सन बनवले तेव्हा कोणत्याही एजन्सीने तुम्हाला अहवाल दिला नाही का?
सेबीद्वारे तपास करत असलेल्या कंपन्यांशी ‘अगोरा’चे आर्थिक-व्यावसायिक संबंध आहेत हे तपास यंत्रणांनी तुम्हाला सांगितले नव्हते का?
माधबी पुरी बूच यांना इतर कंपन्यांकडून इतके पैसे कसे मिळत होते? याचा पुरावा कोणी तुमच्यासमोर मांडला नाही का?
जर हा पुरावा समोर ठेवला असता, तर अजून कसली संगनमत चालू आहे? शेवटी फायदा कोणाला होतोय आणि कुणाला का वाचवले जात आहे?, असे सवाल काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहेत.
महिंद्रा अँड महिंद्राकडून स्पष्टीकरण
काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बूच यांच्यावर आरोप करताना त्यांचे पती धवल बूच यांचे आणि महिंद्रा अँड महिंद्राचे हितसंबंध असल्याचा आरोप केला होता. मात्र, या आरोपानंतर महिंद्रा अँड महिंद्राकडून एक निवेदन प्रसिद्ध करत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. तसेच हे आरोप महिंद्रा समूहाने फेटाळून लावत दिशाभूल करणारे असल्याचं म्हटलं आहे. निवदेनात म्हटलं आहे की, “युनिलिव्हरच्या ग्लोबल चीफ प्रोक्युरमेंट ऑफिसरच्या पदावरून निवृत्त झाल्यानंतर महिंद्रा ग्रुपने २०१९ मध्ये धवल बुच यांची विशेषत: पुरवठा साखळी आणि सोर्सिंगमधील त्यांच्या कौशल्यासाठी नियुक्ती केली. त्यानंतर त्यांनी आपला बहुतेक वेळ ब्रिस्टलकॉन कंपनीमध्ये घालवला. सध्या ते ब्रिस्टलकॉनच्या बोर्डावर आहेत. तसेच माधबी पुरी बूच यांची सेबीच्या चेअरपर्सन म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी सुमारे तीन वर्षांपूर्वी ते महिंद्रा समूहात सामील झाले होते”, असं निवदेनात म्हटलं आहे.