भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील महिला कुस्तीगिरांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांची शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी दखल घेतली. त्यांच्याविरोधात ‘पोक्सो’सह आणखी एका कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या कुस्तीगिरांनी समाधान व्यक्त केलं. मात्र, अटक होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशातच आज ( २९ एप्रिल ) सकाळीच काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी या जंतरमंतर येथील आंदोलनस्थळी पोहचल्या. प्रियंका गांधींनी विनेश फोगाट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांच्याबरोबर चर्चा करत, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रियंका गांधींबरोबर काँग्रेस नेते दीपेंद्र हुड्डाही आंदोलनस्थळी उपस्थित होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सुद्धा कुस्तीगिरांची भेट घेणार आहेत.

हेही वाचा : पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ वक्तव्याला राहुल गांधींचं प्रत्युत्तर; म्हणाले, “जे ४० टक्के कमिशन घेतात, ते…”

दरम्यान, लैंगिक शोषणाबाबतच्या महिला कुस्तीगिरांनी केलेल्या आरोपांच्या चौकशीचा अहवाल जाहीर करून ब्रिजभूषण यांना अटक करण्याच्या मागणीसाठी आघाडीचे कुस्तीगीर २३ एप्रिलपासून जंतरमंतर येथे पुन्हा आंदोलन करत आहेत. त्यांनी ब्रिजभूषण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. अखेर दिल्ली पोलिसांना शुक्रवारी ब्रिजभूषण यांच्यावर गुन्हा दाखल करावा लागला.

हेही वाचा : क्रीडाविश्वातून कुस्तीगिरांना समर्थन! नीरज चोप्रा, अभिनव बिंद्रासह अन्य खेळाडूंचे समाजमाध्यमावरून संदेश

दिल्ली पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यासाठी सहा दिवसांचा अवधी लावला. त्यामुळे ते या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करतील याची खात्री नसल्याचे विनेश फोगट हिने म्हटलं. “पोलीस ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात काय कारवाई करतात, ते पाहू. त्यानंतरच आंदोलन मागे घेण्याबाबत निर्णय घेऊ. ब्रिजभूषण यांना अटक करावी आणि त्यांना सर्व पदांवरून तातडीने हटवण्यात यावं. तसे न झाल्यास ते चौकशीदरम्यान अडथळा निर्माण करतील,” असेही विनेश फोगाटने सांगितलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader priyanka gandhi meet jantar mantar wrestlers bajrang punia sakshi malik vinesh phogat ssa
Show comments