पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सोशल मीडियावरून डीपी बदलवून राष्ट्रध्वज ठेवावा, असे आवाहन केले होते. त्याला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रतिसाद दिला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हॅंडलचा डीपी बदलवून माजी पंतप्रधान पंडीत नेहरू यांचा फोटो लावला आहे.

राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ट्वीटर खात्याचा डीपी बदलवला आहे. त्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा राष्ट्रध्वज हातात घेतल्या फोटो ठेवला आहे. तसेच ट्वीटमध्ये ”तिरंगा हा देशाचा अभिमान आहे. तो प्रत्येक नागरिकाच्या हृदयात आहे”, असे कॅप्शनदेखील दिले आहे.

हेही वाचा – “विचार बदलला म्हणून काय ठार माराल? शांत आहे म्हणजे…”; गाडीवरील हल्ल्यानंतर उदय सामंतांचा सूचक इशारा

हेही वाचा – “…तर उद्धव ठाकरे यांच्यावरही कारवाई करावी लागेल”; अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवनिमित्त प्रत्येकाने आपल्या सोशल मीडियावरील खात्यांचे डीपी बदलवून राष्ट्रध्वजाचा फोटो ठेवावा, असे आवाहन केले होते. तसेच आपण स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होत असताना एका गौरवशाली आणि ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होणार असल्याचेही ते म्हणाले होते.

Story img Loader