गुजरातमध्ये काँग्रेस भाजपाकडून सत्ता खेचून घेईल, असा विश्वास काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. गुजरातमध्ये सत्ताधारी भाजपाविरोधात रोष असल्याचं गांधी यांनी म्हटलं आहे. गुजरातमध्ये आम आदमी पक्ष हवेत असून त्यांना स्थानिक पाठिंबा नाही, असे गांधी म्हणाले आहेत. जाहिरातींच्या आधारावर आप गुजरातमध्ये महत्व वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकादेखील त्यांनी केली आहे. केंद्रातील भाजपा सरकारनं देशाच्या संस्थात्मक चौकटीला मोठं नुकसान पोहोचवलं आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘भारत जोडो’ यात्रेतून सेवाग्राम का वगळले?

“काँग्रेस प्रभावीपणे गुजरात विधानसभा निवडणूक लढवत आहे. आप केवळ हवेत आहे. काँग्रेस हा गुजरातमधील मजबुत पक्ष आहे”, असे गांधी यांनी तेलंगणातील ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान कोथूरमधील सभेला संबोधित करताना म्हटले आहे.

गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाची ‘घर वापसी’, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

मोरबी पूल दुर्घटनेवर राजकारण करायचं नसल्याचं सांगत त्यांनी या घटनेवर भाष्य करण्याचं टाळलं आहे. दरम्यान, राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेच्या सुरवातीला पूल दुर्घटनेतील मृतांना मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीनंतर आरएसएस-भाजपा आणि टीआरएस या पक्षांमधील अंतर्गत निवडणुकांबाबत राहुल गांधी यांनी उत्सुकता व्यक्त केली होती. टीआरएस आणि काँग्रेसमध्ये युती होण्याची शक्यता त्यांनी फेटाळली आहे.

विश्लेषण: मोरबीमध्ये १४३ वर्षं जुना पूल कोसळला, हा पूल कोणी बांधला? जाणून घ्या इतिहास…

“टीआरएसमधील भ्रष्टाचार, त्यांचा दृष्टीकोन आणि वृत्ती आम्हाला मान्य नाही. ते जे काही करत आहेत, त्याच्या आम्ही अगदी विरुद्ध आहोत. के. चंद्रशेखर राव राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय पक्षाच्या नेतृत्वाची कल्पना करण्यास मोकळे आहेत” असा खोचक टोला गांधी यांनी लगावला. राव यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केल्यानंतर ‘तेलंगणा राष्ट्र समिती’चं नाव ‘भारत राष्ट्र समिती’ करण्यात आलं आहे.