पीटीआय, सिलिगुडी
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल करताना देशभरात द्वेष, हिंसाचार पसरवला जात असल्याचा आरोप केला. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर ‘भारत जोडो न्याय यात्रा’ पुढे सुरू झाली.पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथे यात्रेदरम्यान भाषण करताना राहुल म्हणाले की, केंद्र सरकारने अग्निवीर योजना, अल्पकालीन भरती योजना सुरू करून सैन्य दलात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या तरुणांची थट्टा केली आहे. देशभर द्वेष आणि हिंसाचार पसरवला जात आहे. त्याचा कोणताही हेतू साध्य होणार नाही.
द्वेष पसरवण्याऐवजी, आपल्याला आपल्या तरुणांसाठी प्रेम आणि न्याय देण्याचे काम केले पाहिजे. केंद्र सरकार केवळ बडय़ा कंपन्यांसाठी काम करत आहे, गरिबांसाठी नाही या आरोपाचा त्यांनी पुनरुच्चार केला. पश्चिम बंगालमध्ये यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाल्याबद्दल राहुल यांनी कृतज्ञता व्यक्त केली.