कर्नाटक विधानसभेची निवडणूक जिंकल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्रक प्रवास केला. ज्याची चर्चा चांगलीच होते आहे. राहुल गांधी दिल्लीहून शिमला या ठिकाणी गेले होते. अंबाला ते चंदीगढ या भागात त्यांनी ट्रक प्रवास केला. काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी राहुल गांधींचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरलही झाला आहे. राहुल गांधी यांनी अंबाला या ठिकाणाहून ट्रकने प्रवास सुरुवात केली आणि चालकांना येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. राहुल गांधींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत काय म्हणाल्या?

काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी राहुल गांधींचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्या म्हणतात विद्यापीठातले विद्यार्थी, खेळाडू, नोकरदार वर्ग, नोकरी साठी तयारी करणारे युवक, शेतकरी, डिलिव्हरी पार्टनर, बसमध्ये जाणारे सामान्य नागरिक आणि आता अर्ध्या रात्री ट्रक ड्रायव्हर्सशी संवाद का साधत आहेत राहुल गांधी? कारण त्यांना या सगळ्यांचा आवाज ऐकायचा आहे. या सगळ्या वर्गांना काय समस्या भेडसावत आहेत? ते राहुल गांधी जाणून घेत आहेत. आम्ही तुमच्यासोबत उभे आहोत असा विश्वास राहुल गांधी यांनी प्रत्येकाला दिला आहे असंही सुप्रिया श्रीनेत यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी नफरत की बाजारमें मोहब्बत की दुकान खोलने जा रहे हैं. असंही सुप्रिया श्रीनेत यांनी म्हटलं आहे. राहुल गांधींसह देशाची जनता आहे असंही त्या म्हणाल्या आहेत.

राहुल गांधी यांची ही अनोखी पद्धत अनेकांना भावली आहे. लोक हा व्हिडीओ व्हायरल करत आहेत. राहुल गांधी यांनी जी पदयात्रा काढली होती त्याचं यश कर्नाटक निवडणुकीच्या निमित्ताने राहुल गांधींना मिळालं. भारत जोडो यात्रा असं या यात्रेचं नाव होतं. आता या यात्रेचा दुसरा टप्पा निघणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तसंच या विजयामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला आहे.

याआधी राहुल गांधी यांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. संसद भवनाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते नाही तर राष्ट्रपतींच्या हस्ते केलं गेलं पाहिजे या आशयाचं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader rahul gandhi delhi to chandigadrh travel by truck in ambala video viral scj
Show comments