हैदराबाद : तेलंगण विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भारत राष्ट्र समितीचा (बीआरएस) पराभव होईल असा विश्वास काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी व्यक्त केला. पक्षातर्फे राज्यात काढण्यात आलेल्या ‘विजयभेरी’ यात्रेदरम्यान राहुल यांनी भूपालपल्ली ते पेद्दापल्लीला जाताना राहुल गांधी यांनी कोपरा सभा घेतली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तेलंगणामधील निवडणूक ही राजा आणि प्रजा यांच्यादरम्यानची आहे असे म्हणत त्यांनी सत्ताधारी बीआरएसवर टीका केली. तेलंगणामध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार असल्याचा आरोप राहुल यांनी केला. राज्यात दहा वर्षे सत्तेत राहिल्यानंतरही मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव स्वत:ला जनतेपासून दूर ठेवतात असा आरोप राहुल यांनी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader rahul gandhi expressed his belief that rabhav will be victorious the ruling bharat rashtra samithi in the telangana assembly elections amy