पीटीआय, थौबल (मणिपूर)

मणिपूरच्या जनतेच्या वेदना आम्ही समजतो. त्यांना ज्या बिकट परिस्थितीतून जावे लागत आहे त्याची कल्पना असून, राज्यात शांतता व सौहार्द आम्ही पुन्हा आणू असा निर्धार काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केला. भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात मणिपूरच्या दक्षिणेकडील थौबल येथून करण्यात आली. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली.

bjp president jp nadda accuses congress for spreading wrong narrative about manipur
मणिपूरबाबत चुकीचे कथानक पसरवले; भाजप अध्यक्ष नड्डा यांचा काँग्रेसवर आरोप
states denied allegations industrialist gautam adani bribe government officials
अदानी लाचखोरीप्रकरणी राज्यांनी आरोप फेटाळले
canada denies report on modi amit shah jaishankar doval role in nijjar killing
हिंसेशी मोदी, शहांचा संबंध नाही! कॅनडाचे स्पष्टीकरण, वृत्त काल्पनिक आणि खोटे असल्याचे निवेदन प्रसिद्ध
can not say whatever parliament did during emergency all nullity says supreme court
घटनेत धर्मनिरपेक्ष, समाजवादी शब्द प्रकरणी याचिका : आणीबाणी काळात संसदेने जे केले ते निरर्थक ठरविणे अशक्य; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
10 naxals killed after encounter with security personnel in chhattisgarh
Naxalites Killed In Encounter : छत्तीसगडमध्ये १० नक्षलवादी ठार
adani faces arrest challenge extradition to usa possible for questioning
अदानींसमोर अटकेचे आव्हान; चौकशीसाठी अमेरिकेत प्रत्यार्पण शक्य; विरोधकांचे केंद्रावर टीकास्त्र
Harshita Brella’s sister shows her photo and a screenshot of the last WhatsApp message sent to her by her father. (Photo: Farhan Sayeed Masoodi)
WhatsApp वरचा एक न वाचलेला मेसेज, दिल्लीतल्या विवाहितेची लंडनमध्ये झालेली हत्या कशी उलगडली? काय आहे प्रकरण?
Reddy was a second-year student at Kansas State University
बंदूक स्वच्छ करायला घेतली अन् छातीतच लागली गोळी; भारतीय विद्यार्थ्याचा अमेरिकेत वाढदिवशी मृत्यू!
no alt text set
Gautam Adani Fraud: “आम्ही या प्रकरणातून मार्ग काढू…”; गौतम अदणींवरील आरोपांवर अमेरिकेची प्रतिक्रिया

राज्यात मोठय़ा प्रमाणात जिवित व वित्त हानी झाली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेला दिलासा देण्यासाठी आले नाही. कदाचित मोदी तसेच भाजप किंवा संघाला मणिपूर हे भारतात आहे असे वाटत नसावे असा आरोप राहुल यांनी केला. या यात्रेच्या वाहनाला हिरवा झेंडा दाखवताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधानांवर टीका केली. ईशान्येकडील राज्यांत पंतप्रधान केवळ मतांसाठी येतात. मात्र येथील नागरिक अडचणीत असताना विचारपूस करण्यासाठी आले नाहीत असा आरोप खरगेंनी पंतप्रधानांवर केला. समुद्रकिनारी जाण्यासाठी त्यांना वेळ आहे, मात्र मणिपूरसाठी नाही असा टोलाही खरगेंनी लगावला. भाजप हा धर्म आणि राजकारणाची सरमिसळ करत असून जनतेच्या भावना भडकावत असल्याची टीका खरगेंनी केली.

हेही वाचा >>>Bharat Jodo Nyay Yatra : राहुल गांधींची ‘चाय पे चर्चा’, मणिपूरमध्ये साधला स्थानिकांशी संवाद

या यात्रा ६,७१३ किमी अंतर जाणार आहे. त्यात लोकसभेच्या १०० मतदारसंघांचा समावेश असून, ११० जिल्ह्यांतून विधानसभेच्या ३३७ मतदारसंघांतून तीचा प्रवास असेल. ६७ दिवसांनंतर २० मार्चला मुंबईत या यात्रेचा समारोप होईल.

मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांची यात्रेवर टीका

मणिपूरमध्ये आता यात्रा आयोजित करण्याची ही वेळ आहे काय? असा सवाल मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी केला आहे. राज्यातील परिस्थिती सुधारत असताना राहुल गांधी अधिक गोंधळ निर्माण करण्यासाठी ते येत आहेत काय? अशी टीकाही बिरेन सिंह यांनी केली. बिरेन हे भाजपचे नेते असून, त्यांनी पत्रकारांशी बोलताना काँग्रेसवर टीका केली.

मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांची यात्रेवर टीका

मणिपूरमध्ये आता यात्रा आयोजित करण्याची ही वेळ आहे काय? असा सवाल मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी केला आहे. राज्यातील परिस्थिती सुधारत असताना राहुल गांधी अधिक गोंधळ निर्माण करण्यासाठी ते येत आहेत काय? अशी टीकाही बिरेन सिंह यांनी केली. बिरेन हे भाजपचे नेते असून, त्यांनी पत्रकारांशी बोलताना काँग्रेसवर टीका केली.