महागमा (झारखंड) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. भारतातील गरिबांच्या खर्चावर अब्जाधीशांचे हित साधत असल्याचा आरोप त्यांनी पंतप्रधानांवर केला. झारखंडच्या गोड्डा जिल्ह्यात एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना गांधी यांनी दावा केला की विरोधक संविधानाच्या रक्षणासाठी लढत आहेत, तर भारतीय जनता पक्ष (भाजप) ती कचरापेटीत टाकण्याचा प्रयत्न करत आहे.

दरम्यान, जात जनगणनेमुळे विविध संस्थांमधील आदिवासी, दलित आणि ओबीसींची स्थिती स्पष्ट होई, असे ते म्हणाले. आम्ही ५० टक्के आरक्षणाची मर्यादा रद्द करू, पंतप्रधान मोदी जे हवे ते करू शकतात, असे जाहीर आव्हानदेखील त्यांनी दिले. मोदी गरिबांना मान देण्याचे बोलतात, पण शेतकऱ्यांचे कर्ज माफ करत नाहीत, अशी टीकादेखील राहुल गांधी यांनी केली.

Sustainability Crusader Award Announced to Alok Kale Founder and Managing Director of Magnus Ventures Pune news
औद्योगिक कचऱ्यातून नवव्यवसायाची निर्मिती! पुण्यातील तरुण उद्योजकाचा प्रवास
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
43 ministers maharashtra
विश्लेषण : महाराष्ट्रात ४३ मंत्रीच? मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किती असते? या संख्येवर बंधने का असतात?
centre attempts to revive farm reforms unveils draft policy
शेतीमालाच्या विक्री धोरणाबाबत केंद्राची पुन्हा घाई; सूचना, हरकतींसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक
Raj Thackeray Supports WAQF Amendment bill
“गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी घशात घालून…”, वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी राज ठाकरे मैदानात; केंद्र व राज्य सरकारकडे मोठी मागणी

हेही वाचा >>> श्रीलंकेच्या संसदेत एनपीपीला बहुमत ; २२५ पैकी १५९ जागांवर विजय

५६ इंच छातीची भीती वाटत नाही

दरम्यान, भाजप हिंसाचार पसरवत असून जात, पंथ आणि धर्माच्या आधारावर समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, असे राहुल गांधी म्हणाले. यासोबतच मोदी किंवा त्यांच्या ‘५६ इंच छाती‘ची भीती वाटत नाही , असेदेखील ते म्हणाले. ते (मोदी) अब्जाधीशांचे कठपुतळे आहेत, असे सांगून पंतप्रधान लोकांना ‘मन की बात’ सांगतात आणि ‘धडा शिकवतात’ आणि रात्री उद्योगपतींच्या लग्नाचा आनंद लुटतात, असा आरोप त्यांनी केला.

जमिनी बळकावण्यासाठी ठाकरेंचे सरकार पाडले

महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार जमिनी बळकावण्यासाठी पाडण्यात आल्याचा दावा गांधी यांनी केला. मुंबईतील धारावी येथील एक लाख कोटी रुपयांची जमीन एका उद्याोगपतीला देण्याचा मोदींचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.

नरेंद्र मोदी म्हणतात की राहुल गांधी ‘लाल किताब’ दाखवत आहेत. या पुस्तकाचा रंग महत्त्वाचा नाही. त्यात जे काही लिहिले आहे ते आवश्यक आहे. तुम्ही ते वाचले असते तर तुम्ही लोकांमध्ये द्वेष पसरवला नसता, सगळ्यांना आपसात भांडायला लावले नसते. आमच्यासमोर विचारसरणीची लढाई आहे. भाजप-आरएसएस आंबेडकरांचे संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल गांधी, नेते, काँग्रेस</p>

Story img Loader