महागमा (झारखंड) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. भारतातील गरिबांच्या खर्चावर अब्जाधीशांचे हित साधत असल्याचा आरोप त्यांनी पंतप्रधानांवर केला. झारखंडच्या गोड्डा जिल्ह्यात एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना गांधी यांनी दावा केला की विरोधक संविधानाच्या रक्षणासाठी लढत आहेत, तर भारतीय जनता पक्ष (भाजप) ती कचरापेटीत टाकण्याचा प्रयत्न करत आहे.
दरम्यान, जात जनगणनेमुळे विविध संस्थांमधील आदिवासी, दलित आणि ओबीसींची स्थिती स्पष्ट होई, असे ते म्हणाले. आम्ही ५० टक्के आरक्षणाची मर्यादा रद्द करू, पंतप्रधान मोदी जे हवे ते करू शकतात, असे जाहीर आव्हानदेखील त्यांनी दिले. मोदी गरिबांना मान देण्याचे बोलतात, पण शेतकऱ्यांचे कर्ज माफ करत नाहीत, अशी टीकादेखील राहुल गांधी यांनी केली.
हेही वाचा >>> श्रीलंकेच्या संसदेत एनपीपीला बहुमत ; २२५ पैकी १५९ जागांवर विजय
‘५६ इंच छाती’ची भीती वाटत नाही
दरम्यान, भाजप हिंसाचार पसरवत असून जात, पंथ आणि धर्माच्या आधारावर समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, असे राहुल गांधी म्हणाले. यासोबतच मोदी किंवा त्यांच्या ‘५६ इंच छाती‘ची भीती वाटत नाही , असेदेखील ते म्हणाले. ते (मोदी) अब्जाधीशांचे कठपुतळे आहेत, असे सांगून पंतप्रधान लोकांना ‘मन की बात’ सांगतात आणि ‘धडा शिकवतात’ आणि रात्री उद्योगपतींच्या लग्नाचा आनंद लुटतात, असा आरोप त्यांनी केला.
जमिनी बळकावण्यासाठी ठाकरेंचे सरकार पाडले
महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार जमिनी बळकावण्यासाठी पाडण्यात आल्याचा दावा गांधी यांनी केला. मुंबईतील धारावी येथील एक लाख कोटी रुपयांची जमीन एका उद्याोगपतीला देण्याचा मोदींचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.
नरेंद्र मोदी म्हणतात की राहुल गांधी ‘लाल किताब’ दाखवत आहेत. या पुस्तकाचा रंग महत्त्वाचा नाही. त्यात जे काही लिहिले आहे ते आवश्यक आहे. तुम्ही ते वाचले असते तर तुम्ही लोकांमध्ये द्वेष पसरवला नसता, सगळ्यांना आपसात भांडायला लावले नसते. आमच्यासमोर विचारसरणीची लढाई आहे. भाजप-आरएसएस आंबेडकरांचे संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. – राहुल गांधी, नेते, काँग्रेस</p>