Rahul Gandhi National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अलीकडेच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना चौकशीसाठी समन्स जारी केला होता. त्यानुसार राहुल गांधी आज ईडी कार्यालयात हजर झाले आहेत. यावेळी ईडी कार्यालयाबाहेर शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी गर्दी केली असून हातात पोस्टर घेत जोरदार घोषणाबाजी केली आहे. सोनिया गांधी यांची प्रकृती ठीक नसल्याने त्या चौकशीसाठी हजर झाल्या नाहीत.
दुसरीकडे, राहुल गांधी आज चौकशीसाठी येणार असल्याने ईडी कार्यालयाबाहेर शक्तीप्रदर्शन करण्याचं नियोजन काँग्रेसकडून करण्यात आलं होतं. त्यानुसार आज शेकडो कार्यकर्त्यांनी हातात पोस्टर घेत ईडी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली आहे.
दरम्यान, पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. राहुल गांधी यांच्यासोबत प्रियांका गांधी देखील ईडी कार्यालयात दाखल झाल्याचीही माहिती समोर आली आहे.