केंद्रातील काँग्रेस आणि भाजपा नेत्यांमध्ये नेहमी वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन एकमेकांवर कुरघोडी सुरु असते. यादरम्यान अनेक नेत्यांकडून वादग्रस्त विधानं केली जातात. अशातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राजा पटेरिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल धक्कादायक विधान केलं आहे. मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना काँग्रेस कार्यकर्त्यांना मोदींची हत्या करण्यासाठी तयार राहा असा सल्लाच देऊन टाकला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी काँग्रेस नेत्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. काँग्रेस नेते राजा पटेरिया यांनी या बैठकीला संबोधित केलं. यावेळी त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

राजा पटेरिया नेमकं काय म्हणाले ?

जर आपल्याला संविधान वाचवायचं असेल तर मोदींच्या हत्येसाठी तयार राहिलं पाहिजे असं राजा पटेरिया म्हणाले आहेत.

“नरेंद्र मोदी निवडणूक संपवतील; धर्म, जात, भाषेच्या आधारे सर्वाचं विभाजन करतील. दलित, आदिवासी आणि अल्पसंख्यांकांना धोका आहे. जर आपल्याला संविधान वाचवायचं असेल तर मोदींच्या हत्येसाठी तयार राहिलं पाहिजे,” असं ते म्हणाले. दरम्यान यानंतर त्यांनी हत्या म्हणजे पराभव असं सांगत सावरण्याचाही प्रयत्न केला.