पंतप्रधान मनमोहन सिंग यांना गांधी परिवाराचा नाइट वॉचमन असा उल्लेख करणाऱ्या गुजरातच्या मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी माफी मागावी आणि आपले विधान मागे घ्यावे, अशी मागणी करणारी कायदेशीर नोटीस येथील काँग्रेस नेत्याने मोदी यांना पाठवली आहे.
ही कायदेशीर नोटीस मिळाल्यानंतर तीन दिवसांत मोदी यांनी पंतप्रधानांची माफी मागावी, तसेच आपले विधान मागे घ्यावे, अन्यथा त्यांच्या विरोधात येथील न्यायालयात बदनामीचा खटला दाखल करण्याचा इशारा येथील प्रदेश काँग्रेसचे माजी सदस्य के के बेन्सन यांनी दिला आहे. नरेंद्र मोदी यांनी ३ मार्च रोजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे नाव घेता काँग्रेस पक्षाचे  पहिल्या क्रमांकाच्या असणाऱ्या कुटुंबासाठी नाइट वॉचमन म्हणून अर्थतज्ज्ञाची नियुक्ती केल्याचे म्हटले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा