जयपूर : जे लोक निवडणुका जिंकू शकत नाहीत, ते ‘मैदानातून पळून गेले असून’, राजस्थानमधून राज्यसभेवर आले आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यावर टीका केली. देश काँग्रेसला त्याच्या ‘पापांसाठी’ शिक्षा करत असून, एके काळी चारशे जागा जिंकणाऱ्या या पक्षाला यावेळच्या लोकसभा निवडणुकीत तीनशे जागांवर लढण्यासाठी उमेदवार शोधणे कठीण झाले आहे, असे राजस्थानमधील जालोर येथे निवडणूक प्रचार सभेत बोलताना मोदी म्हणाले.
हेही वाचा >>> आरबीआयचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी केंद्र सरकारला दिला ‘हा’ सल्ला; म्हणाले, “श्वेतपत्रिका…”
* जे लोक निवडणूक लढवू शकत नाहीत, निवडणूक जिंकू शकत नाहीत, ते मैदानातून पळून गेले आहेत. या वेळी ते राजस्थानमधून राज्यसभेवर आले आहेत. काँग्रेसची परिस्थिती इतकी वाईट आहे’, असे मोदी यांनी सांगितले.
* मतदानाच्या पहिल्या टप्प्यात निम्म्या राजस्थानने काँग्रेसला दंड केला आहे. काँग्रेस कधीही देशाला मजबूत बनवू शकत नाही हे देशभक्तीने युक्त असलेल्या राजस्थानला ठाऊक आहे’, असे मोदी म्हणाले. २०१४ पूर्वी अस्तित्वात असलेली परिस्थिती परत यावी असे देशाला वाटत नाही, असेही त्यांनी नमूद केले. काँग्रेसने भाईभतिजावाद आणि भ्रष्टाचार यांची वाळवी पसरवून देशाला पोकळ करून टाकले आहे, असा आरोपही त्यांनी केला.