पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या दौऱ्यावरुन परत येताच रविवारी (२६ सप्टेंबर) रात्री अचानक सेंट्रल व्हिस्टा (Central Vista Project) या नव्या संसदेच्या बांधकामाची पाहणी केली. मोदी कोणतीही पूर्वसूचना न देताच रात्री ८ वाजून ४५ मिनिटांनी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पोहचल्याचं सांगितलं जातंय. या भेटीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत. यानंतर काँग्रेसचे नेते श्रीनिवास बी. व्ही यांनी पंतप्रधान मोदींवर खोचक निशाणा साधलाय. मोदींना अमेरिकेची संसद व्हाईट हाऊसमध्ये फोटो काढण्याची संधी मिळाली नाही. म्हणून ते सेंट्रल व्हिस्टा येथे फोटो काढून आपलं काम चालवत आहेत, अशी टीका श्रीनिवास यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रनिवास यांनी एक ट्विट केलं. यात ते म्हणाले, “अमेरिकेत मोदींचं स्वागत झालं नाही, म्हणून दिल्लीतच स्वागत करुन घेतलं. व्हाईट हाऊसमध्ये फोटोशूट झालं नाही म्हणून सेंट्रल व्हिस्टावरच काम चालवून घेतलं. साहेबांचं जगंच वेगळं आहे.”

चित्रपट निर्माते विनोद कापरी यांनी देखील पंतप्रधान मोदींचा एक व्हिडीओ ट्विट केलाय. या व्हिडीओत मोदी सेंट्रल व्हिस्टा बांधकाम परिसरात दिसत आहेत. या ट्विटमध्ये विनोद कापरी यांनी म्हटलं, “कोणतीही पूर्वसूचना न देता भेट दिल्यानं मल्टि कॅमेरा शूट होऊ शकलं नाही आणि लेपल माईक देखील राहून गेला. देशवासीयांनो सॉरी.”

पत्रकार पुण्यप्रसून बाजपेयी यांनी देखील मोदींच्या व्हायरल फोटो आणि व्हिडीओवर खोचक टोला लगावलाय. ते म्हणाले, “जगात आयआयटीची रँकिंग कमी झाली झाली, पण आंतरराष्ट्रीय स्थापत्य अभियांत्रिकी भारताकडे आहे.” यावर सोशल मीडियात देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. आशीष कुमार नावाच्या एक युजरने म्हटलं, “पत्रकार परिषदेला घाबरुन पंतप्रधान रात्रीच सेंट्रल विस्ताकडे जातात. पंतप्रधान परदेश दौऱ्यावरुन आल्यावर पत्रकार परिषद घेतात हा इतिहास आहे. मात्र, हे पंतप्रधान लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी बालिश गोष्टी करतात.”


मोदींच्या पोस्टवर भाजपा खासदाराची खोचक कमेंट; म्हणाला, “कमला हॅरिस यांनी फोटो…”

पोनी जाट नावाच्या युजरने लिहिलं, “कॅमेरा आणि टीव्ही नसता तर भारत आज एका पंतप्रधानाचं टॅलेंट पाहू शकला नसता.” सरकॅझम नावाच्या एक ट्विटर हँडलनेही मोदींवर खोचक टीका केली. मोदींनी अचानक बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणाला भेट दिली आणि यानंतर त्यांनी याची माहिती सर्व न्यूज चॅनलला दिली.”


मोदींच्या फोटोमधील ‘ती’ गोष्ट पाहून भारतीय म्हणाले, “पंतप्रधानही एवढे मध्यमवर्गीय आहेत की त्यांना…”

“पंतप्रधान मोदींची ऊर्जा आम्हा सर्वांना प्रेरणा देणारी”

भाजपच्या नेत्यांनी मात्र पंतप्रधान मोदींच्या सेंट्रल व्हिस्टाच्या भेटीचं कौतुक केलंय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, “विकासाचा ध्यास हाच श्वास! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार हेच सिद्ध केले आहे. अमेरिकेहून परतल्यावर त्यांनी सेंट्रल व्हिस्टाची पाहणी करण्यासाठी जाणे अचंबित करणारे आहे. त्यांची ही ऊर्जा आम्हा सगळ्यांना नेहमी प्रेरणा देते, म्हणूनच मोदीजी आमचे मार्गदर्शक व आदर्श आहेत.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader srinivas bv criticize pm narendra modi over central vista viral photo pbs