Congress Leader Suicide : काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने त्याच्या कुटुंबासह विष पिऊन आत्महत्या केली. या ज्येष्ठ नेत्याने पत्नी आणि दोन मुलांसह विष खाल्लं. या चौघांनी विष खाल्ल्याचं लक्षात येताच या चौघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र या चौघांचीही प्राणज्योत मालवली. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेत काँग्रेसच्या जेष्ठ नेत्याच्या मोठ्या मुलाचा मृत्यू लगेच झाला. इतर तिघंही गंभीर होते. मात्र नंतर या तिघांचाही मृत्यू ( Congress Leader Suicide ) झाला.

कुठे घडली ही घटना?

ही घटना छत्तीसगढची आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंचराम यादव (वय ६५, रा. कोतवाली, जांजगीर क्षेत्र वार्ड क्रमांक १०) यांनी त्यांच्या पत्नीसह आणि दोन मुलांसह विष खाल्लं. पोलीस अधीक्षक राजेंद्र जयस्वाल म्हणाले, पंचराम यादव यांनी त्यांची पत्नी नांदणी यादव (वय ५५), मुलगा सूरज यादव (वय २७) आणि निरज यादव (वय ३२) यांच्यासमवेत विष प्राशन ( Congress Leader Suicide ) केले. त्यानंतर चौघांनाही जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. या चौघांची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना बिलासपूर येथे हलवण्यात आले होते. सिम्स रुग्णालयात निरज यादव याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इतर तिघांना हलवण्यात आले होते. दरम्यान ३१ ऑगस्ट रोजी इतर तिघांचाही मृत्यू ( Congress Leader Suicide ) झाला. या घटनेने हळहळ व्यक्त होते आहे.

Atul Subhash Suicide
Atul Subhash Suicide: गुन्हे मागे घेण्यासाठी ३ कोटी, तर मुलाला भेटू देण्यासाठी ३० लाख रुपयांची पत्नीकडून मागणी; अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी भावाचा खुलासा
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Vijay Vadettiwar statement regarding the Leader of the Opposition Nagpur news
सरकारला विरोधी पक्षनेता हवा असेल तरच नाव देऊ -वडेट्टीवार
Rajya Sabha Winter Session.
Parliament Session : सभापतींना हटवण्यावरून राज्यसभेत गोंधळ, सलग दुसऱ्या दिवशी सभागृहाचं कामकाज स्थगित
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
Bengaluru
Bengaluru : धक्कादायक! पत्नीच्या जाचाला कंटाळून अभियंता पतीने गळफास घेऊन जीवन संपवलं; सुसाईड नोटमध्ये पत्नीवर केले गंभीर आरोप
Image of Vice-President Jagdeep Dhankhar or Rajya Sabha proceedings
No Confidence Motion : भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना, राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
Atul Suhas Suicide
“न्याय प्रलंबित आहे”, गळ्यात फलक लटकावून तरुणाची आत्महत्या; २४ पानी नोटमुळे पोलिसांसमोर आव्हान वाढले!

पंचराम यादव यांनी ४० लाखांचं कर्ज घेतलं होतं

समोर आलेल्या माहितीनुसार, पंचराम यादव कंत्राटदार म्हणून काम करत होते. त्यांनी दोन बँकांकडून ४० लाखांचं लोन घेतलं होतं. शिवाय त्यांना हृदयाशी निगडीत आजारही होता. तसंच पंचराम यादव यांच्या पत्नी कर्करोगाशी झुंज देत होत्या. त्यांचा मुलगा निरज यादव खासगी कंपनीत नोकरी करत होता. तर दुसरा मुलगा वडिलांप्रमाणे कंत्राट घेत होता.

पंचराम यादव यांच्या शेजाऱ्यांनी काय माहिती दिली?

पंचराम यादव यांच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार आत्महत्या करण्यापूर्वी त्याची माहिती कुणाला मिळू नये याची काळजी या कुटुंबाने घेतली होती. कुटुंबियांनी घराच्या बाजूला असलेली दोन्ही गेट्स बंद केली होती. या दारांना दोन्ही बाजूंनी कुलुप लावलं आणि तिसऱ्या ठिकाणी आतून कुलुप लावत त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. एक मुलगी त्यांच्या घरी गेली, तेव्हा याबाबतचा खुलासा झाला. सातत्याने आवाज देऊनही कोणीही दरवाजी उघडत नव्हते. त्यामुळे तिला संशय आला आणि तिने आजूबाजूच्या इतर लोकांना याबाबतची माहिती दिली. ज्यानंतर ही घटना उघडकीस आली. चौघांनाही रुग्णालयात नेण्यात आलं पण काही उपयोग झाला नाही. सुरुवातीला यादव यांचा मोठा मुलगा आणि त्यानंतर मग या तिघांचाही मृत्यू झाला. लाईव्ह हिंदुस्थानने हे वृत्त दिलं आहे.

Story img Loader