जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचं निधन झालं आहे. शिंजो आबे यांच्यावर गोळीबार करण्यात आल्यानंतर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. काँग्रेस नेते सुरेंद्र राजपूत यांनी शिंजो आबे यांच्या हत्येचा संबंध केंद्राच्या अग्निपथ योजनेशी जोडला आहे. सुरेंद्र राजपूत यांनी याबाबत ट्वीट करत भाजपावर निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिंजो आब यांना गोळी मारणारा यामागामी याने जपानच्या SDF म्हणजेच बिना पेनशन वाल्या सैन्यात सेवा बजावली होती. अशा आशयाचे ट्वीट केले आहे. दरम्यान, भाजपा नेते शेहजाद पूनावाला यांनी “शिंजो आबे यांच्या दुःखद निधनावर राजकारण केल्याबद्दल” राजपूत यांच्यावर टीका केली आहे.

काँग्रेसच्या प्रवक्त्याने शिंजो आबे यांच्या निधनावर राजकारण करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी सुरेंद्र राजपूत यांच्यावर कारवाई करणार का असा प्रश्न भाजपा नेते शेहजाद पूनावाला यांनी विचारला आहे. तसेच काहीतरी मर्य़ादा ठेवा असा सल्लाही पूनावाला यांनी राजपूत यांना दिला आहे.

पाहा व्हिडीओ –

शिंजो आबे यांची हत्या करणारा तेत्सुया यामागामी कोण आहे?
वृत्तानुसार, ४२ वर्षीय तेत्सुया यामागामीने २००० साली तीन वर्षे सागरी सेल्फ-डिफेन्स फोर्समध्ये सेवा दिली होती. हल्ल्याच्या ठिकाणी त्याला अटक करण्यात आली असून परिसरातून एक बंदूक जप्त करण्यात आली आहे. आपण शिंजो आबे यांच्यावर असामाधानी होतो, त्यामुळे त्यांची हत्या करण्याची इच्छा होती असा खुलासा तेत्सुया यामागामी याने केला आहे. यामागामी याच्या घरी स्फोटकेही सापडल्याचे वृत्त आहे. शिंजो आबे यांच्यांवर गोळीबार केल्यानंतर तेत्सुयाने पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही. गोळीबारानंतर तो तिथेच थांबून राहिला असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader surendra rajput tweet on shinzo abes death links to agnipath scheme dpj
Show comments