राजस्थान काँग्रेसचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की पक्षाच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले काँग्रेसचे नेते आपापसातच भिडले आहेत. इतर नेते व कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीनंतर हे प्रकरण मिटले. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे देखील या कार्यक्रमाला येणार होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शनिवारी (१७ सप्टेंबर) दुपारी जयपूरमध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सदस्यांची महत्त्वाची बैठक होणार होती. या बैठकीला मुख्यमंत्री अशोक गेहलोत, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा, अजय माकन यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आगमनापूर्वीच काँग्रेस सेवादलाचे नेते अंतर्गत वादातून एकमेकांना भिडले. बाचाबाचीचे रुपांतर धक्काबुकीत झाल्याचेही दिसून झाले. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या मीडिया कर्मचार्‍यांनी याचा व्हिडिओ बनवला, जो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

आम आदमी पार्टीने व्हिडीओ शेअर करत उडवली खिल्ली –

आम आदमी पार्टी, राजस्थानच्या वतीने हा व्हिडीओ शेअर करण्यात आला व लिहिले आहे की, प्रदेश काँग्रेस कमिटीच्या बैठकीत काँग्रेस नेते आपापसात भांडत आहेत, आता राजस्थानमधून त्यांची उलटी गिनती सुरू झाली आहे.

तर एका यूजरने लिहिले आहे की, राहुल गांधी भारत जोडो यात्रा काढत आहेत आणि इथे घरातलीच लोक जोडता येत नाहीए. याशिवाय, अन्य एका यूजरने लिहिले की, काँग्रेसमध्ये कार्यकर्ते आणि नेते एकमेकांना भेटू शकतात आणि सर्वकाही करू शकतात. इतर पक्षांप्रमाणे नाही की हायकमांडच्या भीतीने आवाजच काढायचा नाही.

आधी काँग्रेस जोडा, देश पूर्वी एकसंध होता आणि राहील. इंग्रज सुद्धा प्रयत्न करून परत गेले, तेव्हा देखील ते देशाची एकता खंडीत करू शकले नाहीत. मग आता काय होणार? सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमुळे लोक राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर निशाणा साधताना दिसत आहेत. लोकांचे म्हणणे आहे की, सर्वप्रथम काँग्रेसने आपल्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना सांभाळावे.