काँग्रेसचे राज्यसभेतले खासदार धीरज साहू यांच्या घर आणि कंपनीच्या कार्यालयावर प्राप्तीकर विभागाने धाडी टाकून मोठ्या प्रमाणात बेहिशेबी संपत्ती जप्त केली आहे. साहू यांच्याशी संबंधित झारखंड, ओडिशामधील ठिकाणांवर धाडी टाकून प्राप्तीकर विभागाने ही मालमत्ता जप्त केली आहे. त्यांच्या कार्यालयातील कपाटात ठासून भरलेले नोटांचे बंडल पाहून प्राप्तीकर विभागाचे अधिकारीदेखील चक्रावून गेले असतील. धीरज साहू यांनी ५००, २०० आणि १०० रुपयांच्या नोटांचे असंख्य बंडल कपाटांमध्ये ठासून भरले होते. या छापेमारीत आतापर्यंत ३०० कोटी रुपयांहून अधिक रोकड प्राप्तीकर विभागाच्या हाती लागली आहे.

प्राप्तीकर विभागातील अधिकाऱ्यांच्या हवाल्याने आज तकने वृत्त प्रसिद्ध केलं आहे की, ३०० कोटींहून अधिक रक्कम मोजता मोजता पैसे मोजणाऱ्या मशीनही खराब झाल्या. त्यानंतर हैदराबाद आणि भुवनेश्वर येथून पैसे मोजणारी मोठी मशीन मागवण्यात आली. बुधवारी (६ डिसेंबर) १५० कोटी रुपये मोजल्यानंतर पैसे मोजणाऱ्या मशीन बंद पडल्या होत्या. त्यामुळे प्राप्तीकर विभागाचं काम थांबलं होतं. जे गुरुवारी पूर्ण केलं. पैसे मोजण्यासाठी प्राप्तीकर विभागाने तीन डझन छोट्या मशीनही मगवल्या होत्या. तसेच २० हून अधिक कर्मचारी केवळ पैसे मोजण्याचं काम करत होते.

Municipal employees sealing a property in Kalyan East
कल्याण पूर्वेत थकबाकीदारांच्या मालमत्तांना टाळे
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
mmrda acquire farmers lands in 124 villages of uran panvel and pen for third mumbai
भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांची एकजूट; उरण, पनवेलमधील १२४ गावे संपादित करण्याची अधिसूचना
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
Property tax defaulters properties seized in Titwala
टिटवाळा येथे कर थकबाकीदारांच्या दोन कोटीच्या मालमत्तांना टाळे, पालिकेच्या अ प्रभागाची कारवाई
Pune builders , Pune air pollution, Pune,
बांधकाम व्यावसायिकांवर का होणार कारवाई?
Sugarcane Cultivation Kolhapur , Sugarcane ,
लोकशिवार… मुरमाड जमिनीतील उसाची दमदार लागवड
Bhajepar gram panchayat won over 1 crore in prizes under various government schemes
गावकऱ्यांच्या परिश्रमाने ग्रामपंचायत झाली कोट्यधीश…

दरम्यान, धीरज साहू यांच्याकडे सापडलेल्या या संपत्तीवरून भारतीय जनता पार्टी थेट काँग्रेसला लक्ष्य करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या कारवाईची माहिती समाजमाध्यमांवर जाहीर करत काँग्रेसवर टीका केली. “देशातील नागरिकांनी या नोटांच्या ढिगाऱ्याकडं पाहावं, त्यानंतर त्यांच्या (काँग्रेसच्या) इमानदार नेत्यांची भाषणं ऐकावित, जनतेकडून लुटलेल्या प्रत्येक पैशाचा हिशेब यांना द्यावा लागेल. ही मोदीची गॅरंटी आहे”, अशी एक पोस्ट मोदी यांनी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्सवर केली आहे.

हे ही वाचा >> “मोहोब्बतच्या दुकानामागे गरिबांना लुटणारे…”, काँग्रेस खासदारावरील प्राप्तीकर विभागाच्या धाडींवरून भाजपाचा टोला

दरम्यान, धीरज साहू यांच्याकडे सापडलेल्या या संपत्तीबाबत काँग्रेसकडून कोणत्याही नेत्याने भाष्य केलं नव्हतं. अशातच काँग्रेसचे सचिव आणि खासदार जयराम रमेश यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जयराम रमेश यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, खासदार धीरज साहू यांच्या व्यवसायाशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा काहीही संबंध नाही. या संपत्तीबाबत फक्त साहूच सांगू शकतात. तसेच प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या घर-कार्यालयात सापडलेल्या रोख रकमेबाबत साहू यांनीच सर्व काही स्पष्ट केलं पाहिजे.

Story img Loader