भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या दारुण पराभवाची तुलना आणिबाणीनंतरच्या निकालांशी केली आहे. ही परिस्थिती पाहता लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला तीन आकडी संख्या गाठणे अवघड असल्याचे भाकीत अडवाणींनी आपल्या ताज्या ब्लॉगमध्ये वर्तवले आहे.
मतदारांना प्रलोभन दाखवण्याचा प्रयत्न करूनही काँग्रेसला सपाटून मार खावा लागल्याचे अडवाणींनी सांगितले. विशेषत: राजस्थानमध्ये निवडणुकीच्या तोंडावर अनेक लोकप्रिय योजना काँग्रेसने आणल्या, मात्र मतदारांनी त्यांना धुडाकावले. भ्रष्टाचार, चलनवाढ, काळा पैसा हे मुद्दे पाहता, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला शंभर जागाही मिळणे कठीण असल्याचे विश्लेषण अडवाणींनी केले आहे. महत्त्वाचा टप्पा आता संपला आहे. आता या वर्षी सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांचे भवितव्य निवडणुकीतून ठरणार आहे, असे अडवाणींनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेस दोन अंकी संख्येवर येईल-अडवाणी
भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या दारुण पराभवाची तुलना आणिबाणीनंतरच्या निकालांशी केली आहे.
First published on: 18-12-2013 at 12:29 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress may be reduced to double digits in ls polls advani