भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या दारुण पराभवाची तुलना आणिबाणीनंतरच्या निकालांशी केली आहे. ही परिस्थिती पाहता लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला तीन आकडी संख्या गाठणे अवघड असल्याचे भाकीत अडवाणींनी आपल्या ताज्या ब्लॉगमध्ये वर्तवले आहे.
मतदारांना प्रलोभन दाखवण्याचा प्रयत्न करूनही काँग्रेसला सपाटून मार खावा लागल्याचे अडवाणींनी सांगितले. विशेषत: राजस्थानमध्ये निवडणुकीच्या तोंडावर अनेक लोकप्रिय योजना काँग्रेसने आणल्या, मात्र मतदारांनी त्यांना धुडाकावले. भ्रष्टाचार, चलनवाढ, काळा पैसा हे मुद्दे पाहता, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला शंभर जागाही मिळणे कठीण असल्याचे विश्लेषण अडवाणींनी केले आहे. महत्त्वाचा टप्पा आता संपला आहे. आता या वर्षी सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांचे भवितव्य निवडणुकीतून ठरणार आहे, असे अडवाणींनी स्पष्ट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा