अर्जेंटिनाने फ्रान्सला पराभूत करत फीफा वर्ल्ड कप जिंकला. या विजयात अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीने महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यामुळेच मेस्सीचं जगभरातून कौतूक होत आहे. सोशल मीडियावरही मेस्सीचीच चर्चा आहे. अशातच एका काँग्रेस खासदाराने मेस्सीचा जन्म आसाममध्ये झाल्याचं वक्तव्य केलं. यानंतर ते जोरादर ट्रोल होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आसामचे काँग्रेस खासदार अब्दुल खलीक यांनी ट्वीट करत मेस्सीला शुभेच्छा दिल्या. तसेच आम्हाला तुझ्या आसाम कनेक्शनचा अभिमान आहे, असंही म्हटलं. यानंतर ट्विटर युजर्सने काँग्रेस खासदारांना मेस्सीचं आसाम कनेक्शन काय असे प्रश्न विचारले. याला उत्तर देताना अब्दुल खलीक यांनी मेस्सीचा जन्म आसाममध्ये झाल्याचा दावा केला.

मेस्सीच्या जन्माबाबतच्या दाव्यावर खासदार खलीक ट्रोल

खासदार खलीक यांनी मेस्सीचा जन्म आसाममध्ये झाल्याचा दावा केल्यानंतर ट्विटरवर ते मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले. अनेक युजर्सने खासदार खलीक यांची चेष्टा करणारे ट्वीट केले. कोणी म्हटलं हो मेस्सी आसामचा आहे आणि माझा वर्गमित्र आहे, तर कोणी म्हटलं ते माझ्या दूरच्या नातेवाईकांचा पाहुणा आहे.

ट्रोल झाल्यानंतर काँग्रेस खासदाराकडून ट्वीट डिलीट

मेस्सीचा जन्म आसाममध्ये झाला हा दावा करणारं ट्वीट केल्यानंतर खासदार खलीक ट्रोल झाले. त्यामुळे त्यांनी आपलं हे ट्वीटच डिलीट केलं. मात्र, तोपर्यंत त्यांच्या ट्वीटचे स्क्रिनशॉट्स सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

हेही वाचा : विश्लेषण : विश्वचषक विजयामुळे मेसीचे सर्वश्रेष्ठत्व सिद्ध? पेले, मॅराडोना, रोनाल्डो यांच्यासोबतच्या तुलनांना पूर्णविराम मिळणार?

दरम्यान, मेस्सीच्या नेतृत्वातील अर्जेंटिनाच्या टीमने याआधी १९७८ आणि १९८६ मध्ये विश्वचषक पटकावला होता. त्यानंतर आता तिसऱ्यांदा या चषकावर अर्जेंटिनाचं नाव कोरलं गेलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress mp claim lionel messi was born in assam after victory pbs