प्राप्तिकर विभागाच्या ( आयटी ) छापेमारीत काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्याकडे ३५० कोटींहून अधिक रक्कम आढळून आली होती. पाच दिवसांच्या मोजणीनंतर ही रक्कम प्राप्तीकर विभागाने जप्त केली आहे. यानंतर धीरज साहू यांच्यासह काँग्रेसवर भाजपाकडून टीका करण्यात येत होती. अशातच या पैशांबद्दल धीरज साहू यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

‘एएनआय’शी संवाद साधताना धीरज साहू म्हणाले, “मी गेल्या ३० ते ३५ वर्षापासून सक्रिय राजकारणात आहे. रांची आणि ओडिशात विकासाची कामे केली आहेत. माझे वडिलही गरीबांची मदत करत असे. आम्ही अनेक शाळा कॉलेज आणि कॉलेजची स्थापना केली आहेत. जे होत आहे, त्यानं मला खूप दु:ख झालं आहे.”

Flight Rule Of Handbags Indigo Scales Questioned By Passenger After Same Bag Weighs 2 Kg Differently video
“पैसे उकळण्यासाठी काहीही” विमानतळावर होतेय प्रवाशांच्या बॅगांची फसवणूक? VIDEO पाहून आत्ताच सावध व्हा
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Thane district faces fund shortage due to low funding last year and further cuts this year
ठाणे जिल्हा निधीसाठी तहानलेलाच
Chinese company Bonus Video
टेबलावर ७० कोटी रूपयांचा ढीग… १५ मिनिटांत जेवढे मोजाल तेवढे घेऊन जा; बोनस वाटपाचा Video Viral
Shocking video of a young man died due to making a video while jumping into a river
आयुष्य इतकं स्वस्त असतं का? व्हिडीओ बनवण्याच्या नादात होत्याचं नव्हतं झालं, तरुणाच्या मृत्यूचा VIDEO पाहून थरकाप उडेल
Santosh Deshmukh Brother Dhananjay Deshmukh
Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुख यांचा मोठा खुलासा, “त्यादिवशी आरोपी आणि एपीआयचं चहाचं बिल मीच दिलं, त्यानंतर त्याने…”
mahakumbh mela 2025 viral video
Mahakumbh 2025 : प्रेयसीचा एक सल्ला अन् महाकुंभ मेळ्यात प्रियकर झाला मालामाल, एक रुपया खर्च न करता रोज कमातोय हजारो रुपये; पाहा VIDEO
Congress Statistical Analysis Department head Praveen Chakraborty allegations regarding voter turnout Mumbai news
मतदारवाढ अनाकलनीय; काँग्रेसच्या सांख्यिकी विश्लेषण विभागाचे अध्यक्ष प्रवीण चक्रवर्ती यांचा आरोप

हेही वाचा : “देशात इतका काळा पैसा…”, ३५० कोटींचं घबाड सापडलेल्या धीरज साहूंची ‘ती’ पोस्ट व्हायरल

“कुटुंबीय व्यवसाय पाहत होते”

“जो पैसा प्राप्तिकर विभागाने जप्त केला आहे, तो आमच्या व्यवसायातील आहे. १०० वर्षाहून अधिक काळापासून आमचा मद्य विक्रीचा व्यवसाय आहे. आम्ही मोठ्या प्रमाणात महसूलही दिला आहे. मी राजकारणात सक्रीय असल्यानं कुटुंबीय व्यवसाय पाहत होते,” असं धीरज साहूंनी सांगितलं.

“मद्य विक्री रोकडमध्ये होते”

“प्राप्तिकर विभागाने जप्त केलेला पैसा मद्य व्यवसायातील आहे. कारण, मद्य विक्री रोकडमध्ये होत असते. या पैशाचा काँग्रेस अथवा अन्य पक्षाशी कुठलाही संबंध नाही. हा पैसा माझा नाहीतर माझ्या कुटुंबीयांचा आणि कंपन्यांचा आहे. मी सर्व हिशोब देण्यास तयार आहे,” असं धीरज साहू यांनी म्हटलं.

हेही वाचा : “मोहोब्बतच्या दुकानामागे गरिबांना लुटणारे…”, काँग्रेस खासदारावरील प्राप्तीकर विभागाच्या धाडींवरून भाजपाचा टोला

“कुटुंबीय प्राप्तिकर विभागाकडे आपलं स्पष्टीकरण देतील”

“काहीची देणी आणि महसूल देण्यासाठी पैसे ठेवण्यात आल्याचं कुटुंबीयांकडून मला सांगण्यात आलं. हे प्राप्तीकर विभाग आणि कुटुंबीयांमधील प्रकरण आहे. कुटुंबीय प्राप्तिकर विभागाकडे आपलं स्पष्टीकरण देतील,” असं धीरज साहू म्हणाले.

Story img Loader