गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसकडून सातत्याने उद्योजक गौतम अदाणींचा उल्लेख केला जात आहे. गौतम अदाणींनी आर्थिक घोटाळे केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप काँग्रेसकडून सातत्याने केला जात आहे. खुद्द राहुल गांधींनी थेट देशाच्या संसदेत अधिवेशनादरम्यान अदाणींबाबत सरकारला प्रश्न केला आहे. २० हजार कोटी रुपयांबाबत राहुल गांधींनी केलेल्या आरोपांची चांगलीच चर्चा झाली होती. आज राहुल गांधींनी गौतम अदाणींविषयी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांना शरद पवारांबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राहुल गांधींनी त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडली.

आता आरोप २० नव्हे, ३२ हजार कोटींचा!

या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी नरेंद्र मोदी सरकारवर २० हजार कोटी नसून ३२ हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी गौतम अदाणींना पाठिशी घातल्याचा आरोप केला आहे. यासाठी त्यांनी ब्रिटनमधील फायनान्शियल टाईम्समधील एका बातमीचा दाखला दिला आहे. ‘गौतम अदाणी व कोळसा किमतीचं गूढ’ अशा मथळ्याखाली ही बातमी छापून आली असून त्यावरून राहुल गांधींनी मोदींवर हल्लाबोल केला आहे.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “इंदिरा गांधी मोठ्या नेत्या, पण तेव्हा आमच्यासाठी व्हिलन होत्या”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Image Of Supriya Sule And Ajit Pawar
Supriya Sule : “मी बोलते, पण अजित पवार माझ्याशी…”, पवार कुटुंबीयांतील दुराव्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
Sanjay Raut Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : वाल्मिक कराड आणि फडणवीसांचं नेमकं नातं काय? संजय राऊतांचे मुख्यमंत्र्याना गंभीर सवाल
Supriya Sule At Press Conference.
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, “नैतिकता सांभाळून धनंजय मुंडेंनी राजीनामा….”
Devendra Fadnavis and Sharad Pawar (1)
Sharad Pawar : बीडप्रकरणी शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन; म्हणाले, “राजकारणात मतभेद असतील-नसतील, पण…”
devendra fadnavis sharad pawar
शरद पवारांकडून RSS चं कौतुक, महायुतीशी जवळीक वाढतेय? फडणवीस सूचक वक्तव्य करत म्हणाले…
Ajit Pawar
Ajit Pawar On Loan Waiver : अजित पवारांचं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल मोठं विधान; म्हणाले, “माझ्या भाषणात कधी तुम्ही…”

“अदाणी इंडोनेशियातून कोळसा खरेदी करतात. तो कोळसा भारतात येईपर्यंत त्याची किंमत दुप्पट झालेली असते’. या माध्यमातून त्यांनी सामान्य गरीब भारतीयांच्या खिशातून जवळपास १२ हजार कोटी रुपये उकळले आहेत. आपल्याकडे विजेचे दर वाढत जातात. अदाणी किंमती वाढवतात, गरीबांच्या खिशांमधून ते पैसा काढत आहेत. ही बातमी कोणतंही सरकार कोसळवू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याला वारंवार वाचवत आहेत, अशा माणसाकडून ही थेट चोरी आहे”, असं राहुल गांधी पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.

शरद पवारांना प्रश्न का विचारत नाहीत?

दरम्यान, या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने मोदींना जसे प्रश्न विचारता, तसेच गौतम अदाणींची वारंवार भेट घेणाऱ्या शरद पवारांना असे प्रश्न का करत नाही? असा प्रश्न राहुल गांधींना विचारला. त्यावर राहुल गांधींनी स्पष्ट शब्दांत उत्तर देत शरद पवारांची बाजू घेतली.

Video: “या बातमीमुळे कोणतंही सरकार कोसळू शकतं”, राहुल गांधींचं मोठं विधान, अदानींवर हल्लाबोल!

“मी शरद पवारांना याबाबत कधीही प्रश्न केलेला नाही. शरद पवार देशाचे पंतप्रधान नाहीयेत. शरद पवार गौतम अदाणींना पाठिशी घालत नाहीयेत. पंतप्रधान मोदी अदाणींना पाठिशी घालत आहेत. त्यामुळेच मी हा प्रश्न मोदींना विचारत आहे. जर शरद पवार देशाचे पंतप्रधान असते आणि ते गौतम अदाणींना पाठिशी घालत असते, तर मी हा प्रश्न शरद पवारांना केला असता”, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

दरम्यान, राहुल गांधींनी या विधानातून शरद पवार-गौतम अदाणी भेटीवर आपला कोणताही आक्षेप नसल्याचंच अप्रत्यक्षपणे सूचित केल्याचं बोललं जात आहे.

Story img Loader