राजधानी दिल्लीत दोन दिवसीय जी २० शिखर परिषद पार पडली असून या परिषदेतून काय साध्य झालं? यावर आता चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे सत्ताधारी पक्षाकडून परिषदेच्या निमित्ताने मोदींनी देशाला जागतिक पातळीवर मोठं स्थान मिळवून दिल्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे विरोधकांकडून यासंदर्भात टीका-टिप्पणी सुरू झाली आहे. मात्र, काँग्रेसकडून केंद्र सरकारला लक्ष्य केलं जात असलं, तरी काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी मात्र या परिषदेतून साध्य झालेल्या गोष्टींबद्दल मोदी सरकारवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

काय म्हणाले शशी थरूर?

शशी थरूर यांनी मोदी सरकारं कौतुक केलं आहे. “जी २० परिषदेतून आपण जे साध्य केलं आहे, ते नक्कीच भारतासाठी मोठं राजनैतिक यश म्हणावं लागेल. कारण हे सर्व नेते भारतात येईपर्यंत याचीच शंका होती की त्यांचं संयुक्त निवेदन तरी निघू शकेल की नाही. रशिया-युक्रेन युद्धाचं समर्थन करणारे व विरोध करणाऱ्यांमध्ये एकमत होणं निव्वळ अशक्य वाटत होतं. पण या मुद्द्यावर गेल्या ९ महिन्यांत अशक्य वाटणारा फॉर्म्युला प्रत्यक्षात मंजूर करून घेण्यात सरकारला यश आलं आहे. हे भारताचं यश म्हणता येईल”, असं शशी थरूर म्हणाले.

Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Sadhguru disheartened over Parliament disruptions on adani issue
Sadhguru on Adani: ‘उद्योगपतींवरून संसदेत रणकंदन नको’, अदाणींना समर्थन देत सद्गुरुंनी व्यक्त केली नाराजी
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
russia ins tushil
रशियाने भारताला सुपूर्द केली क्षेपणास्त्राने सुसज्ज युद्धनौका; ‘आयएनएस तुशील’ काय आहे? भारतासाठी याचे महत्त्व काय?
Image of Zelensky
Russia Vs Ukraine War : “जोपर्यंत नाटोचे सदस्यत्व…”, झेलेन्स्की यांनी का केली युक्रेनमध्ये परदेशी सैन्य तैनात करण्याची मागणी?
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान

कौतुक केलं, पण चिंताही व्यक्त केली!

दरम्यान, शशी थरूर यांनी मोदी सरकारचं कौतुक जरी केलं असलं, तरी त्यांनी या परिषदेच्या आयोजनासंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. “या आयोजनात दिल्लीच्या सामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. विशेषत: रोजंदारीवर पोट भरणाऱ्यांना. सरकारची जबाबदारी गरिबी हटवण्याची आहे, गरीबांना दृष्टीआड करण्याची नाही. पण या परिषदेच्या आयोजनात दुसरी बाब सरकारच्या अग्रक्रमावर असल्याचं दिसतं”, असं शशी थरूर म्हणाले.

विरोधकांना आमंत्रणच नाही!

या परिषदेसाठी विरोधी पक्षांना आमंत्रण न दिल्याचा मुद्दा शशी थरूर यांनी या मुलाखतीत उपस्थित केला. “विरोधी पक्षनेते, विरोधी पक्षातील खासदार, वेगवेगळ्या समित्यांमधील विरोधी पक्षांचे सदस्य यापैकी कुणालाच परिषदेतील कोणत्याच कार्यक्रमाचं आमंत्रण नव्हतं. त्यामुळे परिषदेत राजनैतिक पातळीवर जी सर्वसमावेशकता दिसली, ती आपल्या अंतर्गत राजकीय पातळीवर मात्र दिसून आली नाही”, अशा शब्दांत शशी थरूर यांनी नाराजी व्यक्त केली.

अमेरिका युक्रेनला पुरवणार डिप्लिटेड युरेनियम… हे नेमके काय असते? त्यावर रशियाचा तीव्र आक्षेप का?

एस. जयशंकर व अमिताभ कांत यांचं कौतुक!

दरम्यान, शशी थरूर यांनी एएनआयशी बोलताना जी २० परिषदेसाठीचे भारताचे शेर्पा अमिताभ कांत व परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचं विशेष कौतुक केलं आहे. “मी या दोघांशी बोलतो आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो. कारण त्या दोघांनी जे केलंय, ते भारतासाठी निश्चितच खूप चांगलं आहे. अशा प्रकारची राजनैतिक चर्चा घडवून आणणं हे सोपं काम नाही. त्या दोघांनी यासाठी खूप कष्ट घेतल्याचं दिसतंय”, असं शशी थरूर यांनी नमूद केलं.

Story img Loader