काँग्रेसचे खासदार शशी थरुर अनेकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतात. आपलं इंग्रजी तर कधी महिला खासदारांसोबत काढलेल्या सेल्फीमुळे ते कधी कौतुकाचा तर कधी वादाचा विषय ठरले आहेत. सध्या थरुर यांचा सभागृहातील एक व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडीओमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळेही दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शशी थरुर यांनी यावर स्पष्टीकरण दिलं असून त्यानंतर थेट गाणंही पोस्ट केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हिडीओत काय आहे?

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये संसदेच्या सभागृहामध्ये थरुर हे त्यांच्या सीटवरुन पुढील रांगेत बसलेल्या सुप्रिया सुळेंसोबत बोलताना दिसत आहेत. सुप्रिया या मागे वळून थरुर यांना काहीतरी सांगत असून थरुर हे टेबलवर डोकं ठेऊन अगदी पुढे वाकून सुळे यांचं म्हणणं ऐकताना दिसत आहेत. सुप्रिया यांच्या बाजूला उभे असणारे फारुख अब्दुल्ला हे या वेळेस सभागृहात बोलत होते.

थरुर यांचं स्पष्टीकरण

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर थरुर यांनी ट्विटरवरुन या व्हिडीओसंदर्भात भाष्य केलं आहे. माझ्या आणि सुप्रिया सुळेंच्या व्हिडीओबद्दल चर्चा करणाऱ्यांसाठी ही पोस्ट असल्याचं म्हणत त्यांनी एक ट्विट केलं आहे. “सुप्रिया सुळे आणि मी लोकसभेमध्ये चर्चा करत असतानाच्या व्हिडीओचा आनंद घेणाऱ्यांना सांगू इच्छितो की त्या मला एका धोरणांसंदर्भात प्रश्न विचारत होत्या कारण सदनामध्ये बोलण्याचा पुढचा क्रमांक त्यांचा होता. फारुख अब्दुल्ला यांच्या भाषणामध्ये व्यत्यय यायला नको म्हणून त्या (सुप्रिया सुळे) हळू आवाजात बोलत होत्या. त्यामुळे मी थोडं पुढे वाकून त्यांचं म्हणणं ऐकण्याचा प्रयत्न करत होतो,” असं थरुर यांनी स्पष्ट केलं आहे.

मात्र या पोस्टमध्ये त्यांनी सुप्रिया सुळेंच्या अधिकृत ट्वीट हँण्डलऐवजी भलतंच अकाऊंट टॅग केल्यानेही नेटकऱ्यांना त्यावरुन खिल्ली उडवली.

हे स्पष्टीकरण दिल्यानंतर शशी थरुर यांनी आणखी एक ट्विट केलं असून यावेळी त्यांनी थेट चित्रपटातील गाण्याच्या ओळीच पोस्ट केल्या आहेत. “कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना” हे गाणं पोस्ट करत त्यांनी टीकाकारांना उत्तर दिलं आहे.

हिवाळी अधिवेशनातील सेल्फीची चर्चा…

थरुर हे महिला सहकाऱ्यांमुळे चर्चेत येण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी मागील वर्षीच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी पोस्ट केलेला महिला खासादारांसोबतचा सेल्फी हा फोटो कॅप्शनमुळे चर्चेत होता. २९ नोव्हेंबर २०२१ रोजी संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु झालं होतं. याच अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर थरुर यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन सकाळी पावणे बाराच्या सुमारास एक फोटो ट्विट केला होता. या फोटोमध्ये थरुर हे सहा महिला खासदारांसोबत दिसून येत आहेत. फोटोमध्ये सर्वात पुढे उभ्या असलेल्या माहिला खासदारानेच हा सेल्फी फोटो काढल्याचं सांगण्यात आलं. या फोटोमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेही दिसत होत्या. सुप्रिया सुळेंसोबतच पतियालाच्या खासदार परनित कौर, खासदार आणि बंगालच्या अभिनेत्री नुसरत जहाँ, मिमि चक्रवर्ती, ज्योतिमणी आणि डीएमकेच्या खासदार थामीझाची या फोटोत आहेत. या सर्वांचे हॅण्डल्स थरुर यांनी टॅग केलेत. मात्र या फोटोला दिलेल्या कॅप्शनवरुन चर्चांना उधाण आलं असून या वरुन दोन गट पडल्याचं दिसून आलं.

थरुर यांनी हा महिला खासदारांसोबतचा सेल्फी शेअर करताना, “कोण म्हणतं की लोकसभा ही कामासाठी आकर्षक जागा नाहीय?, माझ्यासोबतच्या सहा महिला सहकारी खासदारांसोबत सकाळी (काढलेला हा फोटो),” अशी कॅप्शन दिली होती.

काहींनी या फोटोवर महिला या काही केवळ सौंदर्यासाठी ओळखल्या जात नाही असा टोला थरुर यांना लगावला होता. लोकसभेचं कामकाज अधिक आकर्षक होण्यासाठी महिला तिथे नाहीयत. त्या सभागृहाच्या सदस्य आहेत. तुम्ही त्यांचा अपमान करतायत, असा एकीने म्हटलं होतं. तर इतरांनी थरुर यांनी केलेलं हे ट्विट फार गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचं म्हणत याकडे चुकीच्या अर्थाने पाहू नका असा सल्ला दिलेला.