उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून  केंद्रीय मंत्री हरीश रावत (वय ६५) यांचा शपथविधी शनिवारी झाला.
रावत यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी सोनिया गांधी यांनी निश्चित केले व नंतर विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.  हरीश रावत यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्याचे  काँग्रेस नेते जनार्दन द्विवेदी यांनी सांगितले. रावत यांच्या निवडीचा एक ओळीचा ठराव विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.
 विधिमंडळ पक्षाची बैठक केंद्रीय निरीक्षकांच्या देखरेखीखाली झाली, त्या वेळी काँग्रेसचे उत्तराखंडचे प्रभारी संजय कपूर, अंबिका सोनी व गुलाम नबी आझाद हे उपस्थित होते.  विजय बहुगुणा यांनी उत्तराखंड मुख्यमंत्रिपदाचा कालच राजीनामा दिला होता. बहुगुणा यांनी गेल्या वर्षी नैसर्गिक आपत्तीच्या वेळी प्रतिसाद देण्यात दिरंगाई केली त्यामुळे त्यांना पदावरून दूर करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा