भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना मी नेहमीच गंभीरपणे घेतो आणि त्याबाबत कोणतीच शंका असण्याचे कारण नाही, असं पंतप्रधान मनमोहन सिंग आज (शुक्रवार) एका कार्यक्रमांत प्रश्नोत्तराच्या दरम्यान म्हणाले. मोदी यांच्याकडून होणा-या आरोपांना गंभीरपणे घेतले पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. मी अशा लोकांमधील आहे, जे आपल्या विरोधकांना गंभीरपणे घेतात आणि यामध्ये हलगर्जीपणा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसेच कॉंग्रेस पक्ष हा मोठ्या आत्मविश्वासाने निवडणुकीला सामोरा जात आहे, असंही ते पुढे म्हणाले.  
मनमोहन सिंग म्हणाले कि, निवडणुकीचे निकाल काहीही असोत, त्याने खचता कामा नये. एका प्रश्नाला उत्तर देताना मनमोहन सिंग यांनी, हिंसाविरोधी विधेयक आणून त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न असण्याचे आरोपही पूर्णपणे फेटाळून लावले. गेल्या पाच-सहा वर्षांत आपल्या देशात आपण जातीय दंगीलींचा सामना करत आहोत. त्यामुळे जर दंगली थांबवणे शक्य नसेल तर, त्याला बळी पडलेल्यांना योग्य ती भरपाई मिळेल, असा सरकारचा प्रयत्न आहे.
हिंसाविरोधी विधेयक संसदेत मान्य झाले तर त्याचा समाजातील विकृत शक्तींचा नायनाच करण्यासाठी उपयोग होईल. दहशतवादाच्या प्रश्नाला उत्तर देताना मनमोहन सिंग म्हणाले कि, जातीय विभाजन करणे हेच त्यांचे अंतिम ध्येय असते. परंतू हे सर्व प्रयत्न सरकारने हाणून पाडले असल्याचं मनमोहन सिंग म्हणाले.

Story img Loader